तूर उत्पादक शेतकऱ्यांना आले ‘अच्छे दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:14 AM2021-02-11T04:14:10+5:302021-02-11T04:14:10+5:30
कावली वसाड : यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीचे पीक अतिपावसामुळे सडले असले तरी शेतकऱ्यांनी विविध प्रकारचे फवारणी ...
कावली वसाड : यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीचे पीक अतिपावसामुळे सडले असले तरी शेतकऱ्यांनी विविध प्रकारचे फवारणी करून या पिकाला वाचण्याचा प्रयत्न केला. त्याचे चांगले परिणाम शिवारात दिसत आहेत. त्यातच आता तुरीचे भाव गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ आले म्हणण्याची स्थिती कावली शिवारात दिसत आहे.
यावर्षी मोठ्या प्रमाणात पावसाळा झाल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन या पिकाला फटका बसला. परिणामी उत्पन्नात घट झाली. तरीही परिसरातील शेतकऱ्यांनी मुबलक भूजलसाठा व अप्पर वर्धा धरणाच्या सिंचनावर रबी हंगामात गहू व हरभरा या पिकांची लागवड केली. त्यामुळे झालेल्या नुकसानाचे काही प्रमाणात फायदा होईल, अशी आशा व्यक्त होत असतानाच असतानाच खासगी बाजारातील तुरीचे भाव सात हजारांवर गेल्याचे सध्याचे चित्र आहे.
कावली व वसाड येथील शेतकरी सुधीर इंगळे व श्रीधर ढोले या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केवळ तूर पेरली होती. या पिकाला योग्य व्यवस्थापन केले व उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तूर या पिकाला अत्यल्प खर्च असून, त्याचे योग्य व्यवस्थापन व वन्यप्राण्यांपासून बचाव केला, तर हे शेतकऱ्यांना परवडणारे पीक असल्याचे इंगळे यांनी स्पष्ट केले.
कापसानेही दिला दगा
सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने पिकात घट झाली, तर काही शेतकऱ्यांनी जनावरे सोडली. एकीकडे कापूस या पिकाला चांगले मिळाले असले तरी उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तुर या पिकाचा फायदा झाले असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.