आयुक्तांच्या हाती ‘गुड मॉर्निंग’ पथकाची धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 10:42 PM2017-09-05T22:42:38+5:302017-09-05T22:43:04+5:30

शहर हागणदारीमुक्तीचा दर्जा शाश्वतरीत्या टिकविण्याच्या हेतूने आयुक्त हेमंत पवार यांनी मंगळवारी पहाटे विविध भागांचा दौरा केला.

The 'Good Morning' Squad Movement in the hands of the commissioners | आयुक्तांच्या हाती ‘गुड मॉर्निंग’ पथकाची धुरा

आयुक्तांच्या हाती ‘गुड मॉर्निंग’ पथकाची धुरा

Next
ठळक मुद्देनिलाजºयांचे उपरोधिक स्वागत : स्वच्छता कर्मचाºयांची कानउघाडणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहर हागणदारीमुक्तीचा दर्जा शाश्वतरीत्या टिकविण्याच्या हेतूने आयुक्त हेमंत पवार यांनी मंगळवारी पहाटे विविध भागांचा दौरा केला. त्यांनी ओडी स्पॉटला भेट दिली. तेथे उघड्यावर शौचास जाणाºया व्यक्तींचा प्रतिकात्मक सत्कार केला. एका ठिकाणी उघड्यावर जात असलेल्या व्यक्तीकडून उठबशा काढून घेण्यात आल्या. या मॅराथॉन भेटीत त्यांनी प्रभागातील स्वच्छतेसह स्वच्छता कामगारांची हजेरी, त्यांचेकडे नसलेले गणवेश, आोळखपत्र या बाबींचा आढावा घेतला. त्यांनी छत्री, प्रथमेश आणि वडाळी तलाव परिसरात पाहणी करून गणेश विसर्जनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.
'क' आणि 'ड' वर्ग महापालिकांमधील गूड मॉर्निंग पथकाची धुरा आयुक्तांनी सांभाळावी, अशा सूचना नुकत्याच नगरविकास विभागाने दिल्यात. त्या शासनादेशाची काटेकोर अंमलबजावणी करीत आयुक्तांनी पहाटे ६ वाजताच चपराशीपुरा भागाकडे कूच केली. तेथे हजेरी तपासल्यानंतर वडाळी, छत्रीतलाव, प्रथमेश तलाव, वडाळी ओडी स्पॉट आदी भागांची पाहणी केली. वडाळी आणि छत्रीतलाव परिसरात उघड्यावर शौचास जाणाºयांकडून त्यांनी शौचालयांची स्थिती जाणून घेतली. एकाने महपालिकेने दिलेल्या निधीतून केवळ टाक्याचे बांधकाम, तर दुसºयाच्या शेजारी सार्वजनिक शौचालाय असताना ही ते उघड्यावर बसल्याची कबुली त्यांनी दिली. स्वच्छता कंत्राटदारासोबत स्वास्थ्य निरीक्षकांनी त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले.उघड्यावर जाणाºया व्यक्तींना अटकाव घालण्यासाठी ६ वाजता घराबाहेर पडणारे पवार पहिले आयुक्त असल्याची प्रतिक्रिया प्रशासकीय वर्तुळात उमटली. यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम, सहायक आयुक्त योगेश पिठे, मंगेश वाटाणे, सुनील पकडे, अमित डेंगरे आदींची उपस्थिती होती.

Web Title: The 'Good Morning' Squad Movement in the hands of the commissioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.