‘ओडीएफ’कडे दमदार पाऊल, १८ हजार स्वच्छतागृहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 04:28 PM2017-09-28T16:28:20+5:302017-09-28T16:30:04+5:30

A good step towards the ODF, 18 thousand sanitary latrines | ‘ओडीएफ’कडे दमदार पाऊल, १८ हजार स्वच्छतागृहे

‘ओडीएफ’कडे दमदार पाऊल, १८ हजार स्वच्छतागृहे

Next

 अमरावती -  सन २०१८ च्या पूर्वार्धात होणा-या स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या शंभरात येण्यासाठी महापालिकेने पूर्वतयारीला गती दिली आहे. याअनुषंगाने महापालिका क्षेत्रात १२,४२४ वैयक्तिक शौचालयांसह तब्बल १८,२५६ शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी अमरावती महापालिकेचे नगरविकास विभागाकडून खास कौतुकही करण्यात आले आहे. संपूर्ण विदर्भात महापालिकेने स्वच्छतागृहाबाबतीत रेकॉर्डब्रेक कार्यपूर्ती केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आकारास आलेले स्वच्छ भारत अभियान राज्यातही राबविले जात आहे. त्याअनुषंगाने गतवर्षीपासून ‘स्वच्छ सर्वेक्षण’ ही देशव्यापी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या स्पर्धेंतर्गत हागणदारीमुक्ती, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक, कचरा संकलन आणि सार्वजनिक स्वच्छतेसह अन्य पूरक बाबींचा समावेश आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१७ च्या अनुषंगाने अमरावती शहर तब्बल २३१ व्या क्रमांकावर राहिले. त्यावेळी आलेल्या क्युसीआयने टीमने शहराची स्वच्छतेविषयक पाहणी केली होती. त्यावेळीही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित नसल्याने शहराचे मानांकन माघारले होते. यंदा जानेवारी २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत तपासणी होईल. त्याअनुषंगाने महापालिकेने दमदार पावले उचललण्यास सुरूवात केली आहे. त्यापार्श्वभूमिवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची डीपीआर बनविणे सुरू असून अकोली आणि बडनेरा येथेही प्रत्येकी २५ टन क्षमतेचे प्रकल्प उभारले जाणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमिवर शौचालयांच्या तुलनेत व्यवस्थापन आणि विलगीकरणावर भर दिला जाणार आहे. दरम्यान आतापर्यंत ‘एसबीएम’ मधून तब्बल १२,४२४ वैयक्तिक शौचालये बांधण्यात आल्याने शहराची वाटचाल हागणदारीमुक्त शहराकडे सुरू झाल्याचे सुखद चित्र आहे.
 
सर्व प्रकारची स्वच्छतागृहांवर भर
पाचही झोनमधील १२,९०६ लाभार्थ्यांना ८,५०० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता, ११,३९० लाभार्थ्यांना ६,५०० व ३,५०० रुपयांप्रमाणे उर्वरित हप्ते देण्यात आले. आतापर्यंत १२४२४ शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. पैकी १२,३९८ शौचालयांचे जिओटॅगिंग करण्यात आले. सार्वजनिक शौचालयात १,६१७ शिरस, तर १९८ शिरस पैसे देऊन शौचालय वापरण्यासाठी उभारण्यात आल्या आहेत. २४८ शिरस माध्यमातून सामुदायिक शौचालये उभारण्यात आलीत. याशिवाय आधी विविध योजनांमधून ५,८३२ वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधण्यात आले आहेत. 

Web Title: A good step towards the ODF, 18 thousand sanitary latrines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार