गोर बंजारा समाजाचा तिजारोपण थाटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 01:28 AM2019-08-18T01:28:40+5:302019-08-18T01:31:25+5:30
गोर बंजारा समाजातील पारंपरिक तीज महोत्सवाला शानिवारी दुपारी ३ वाजता तिजारोपणाने प्रारंभ झाला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात शहरातील २०० वर बंजारा भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गोर बंजारा समाजातील पारंपरिक तीज महोत्सवाला शानिवारी दुपारी ३ वाजता तिजारोपणाने प्रारंभ झाला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात शहरातील २०० वर बंजारा भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
तांड्याचे नायक प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्त्वात गोपालनगर स्थित त्रिमूर्ती नगरातील बंजारा तांड्याचे समन्वयक श्रावण जाधव यांच्या निवासस्थानी संत सेवालाल महाराजांच्या झेंड्यासमोर तीज रोपण करण्यात आले. कार्यक्रमाला एम.एच. राठोड, प्राचार्य जयंत वडते, तांड्याचे कारभारी किसनराव राठोड, आसामी नामदेव जाधव, नसाबी विजय आडे, हिरामन राठोड, पंडित राठोड उपस्थित होते. २५ आॅगस्ट रोजी कमल प्लाझा येथे महोत्सवाची सांगता होईल. कार्यक्रमाचे संचालन रमेश राठोड यांनी केले.