परतवाड्यातून गोवंशाची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 01:25 AM2019-07-12T01:25:17+5:302019-07-12T01:31:13+5:30

येथून अकोला येथील कत्तलखान्याकडे जाणाऱ्या एका वाहनातील नऊ गोवंशांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली, तर चौघे पसार होण्यात यशस्वी झाले. बुधवारी रात्री आठ वाजता शहरातील अंजनगाव बस स्टॉपवर ही कारवाई करण्यात आली.

Govansh rescued from backyard | परतवाड्यातून गोवंशाची सुटका

परतवाड्यातून गोवंशाची सुटका

Next
ठळक मुद्देदोघांना अटक : चौघे पसार, अंजनगाव स्टॉपवरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : येथून अकोला येथील कत्तलखान्याकडे जाणाऱ्या एका वाहनातील नऊ गोवंशांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली, तर चौघे पसार होण्यात यशस्वी झाले. बुधवारी रात्री आठ वाजता शहरातील अंजनगाव बस स्टॉपवर ही कारवाई करण्यात आली. त्यांचेकडून ६ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्हा गुन्हे शाखेच्या अचलपूर पथकाने शहरातील अंजनगाव स्टॉप येथे एमएच ३० बीडी ०९३५ क्रमांकाचे मालवाहू वाहन तपासले असता, त्यात नऊ गोवंश जनावरे आढळून आली. त्यांची किंमत १ लाख ८ हजार रुपये सांगण्यात आली. शेख इमरान शेख रज्जाक (३५, मुजफ्फरनगर, लकडगंज, अकोला) व अजमत शहा (१८, दिरानगर, अकोटफैल, अकोला) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध परतवाडा पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शहजादखान पीरखान मोती मिल रोड अकोला, शरीफ कुरेशी (मोमीनपुरा अकोला), शेख सलीम शेख अब्दुल आणि मतीन (रा.कुरेशी मोहल्ला, करजगाव) असे चौघे पसार झाले. करजगाव येथील दोन्ही आरोपींविरुद्ध शिरजगाव, चांदूर बाजार, परतवाडा येथे गोवंश तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. सर्व गोवंश रासेगाव येथील गौरक्षणात पाठविण्यात आले.
गोवंश तस्करी आणि पेट्रोलिंग
अकोला येथे कत्तलखान्यात नेण्यात येणारे गोवंश एका मालवाहू वाहनातून नेत असताना ते वाहन सुरक्षित निघत आहे किंवा नाही, वाहतुकीदरम्यान धोका आहे किंवा कसे, हे पाहण्यासाठी अन्य एका वाहनात चार जण आढळल्याचे पोलीस तपासात उघड झाले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील किनगे, सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, पोलीस कॉन्स्टेबल त्र्यंबक मनोहर, गजेंद्र ठाकरे, योगेश सांभारे, प्रवीण अंबाडकर, गणेश मांडोवकर यांनी केली.

Web Title: Govansh rescued from backyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.