दर्यापूर नगर परिषद हद्दवाढीस शासनाची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:09 AM2021-06-30T04:09:56+5:302021-06-30T04:09:56+5:30
आमदार बळवंत वानखडे यांच्या अथक प्रयत्नांना यश बळवंत वानखडे यांच्या प्रयत्नांना यश दर्यापूर : शहरालगरच्या ग्रामपंचायती दर्यापूर नगर ...
आमदार बळवंत वानखडे यांच्या अथक प्रयत्नांना यश
बळवंत वानखडे यांच्या प्रयत्नांना यश
दर्यापूर : शहरालगरच्या ग्रामपंचायती दर्यापूर नगर परिषदेमध्ये सामावून घेण्याबाबत बऱ्याच कालावधीपासून मागणी होती. आमदार बळवंत वानखडे व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याने अखेर नगर परिषदेच्या हद्दवाढीस २९ जून रोजी मान्यता मिळाली आहे.
शहरालगत असलेल्या गायवाडी, जहानपूर, पेठ इतबारपूर, लोधीपूर, गणेशपूर, शिवर, लेहेगाव या गावांतील काही भाग लगतच्या ग्रामपंचायतींमध्ये आहेत. दर्यापूर शहराला खेटून असले तरी ग्रामपंचायतींचा भाग असल्याने विकासकामांना सदर भागात अंशत: ब्रेक लागला होता. आता मौजा दर्यापूर पूर्वेकडील जहानपूर, पेठ इतबारपूर, चांदूर, मौजे बाभळी पश्चिमेकडील लोधीपूर, उत्तरेकडील लोधीगाव, लेहगाव, दर्यापूर उत्तरेकडील पेठ इतबारपूर, दर्यापूर पूर्वेकडील गणेशपूर, दर्यापूर दक्षिणेकडील गणेशपूर साईनगर, शिवर या महसुली गावांतील बहुतांश सर्व्हे नंबरचा समावेश हद्दवाढीत झाला आहे. त्याचा फायदा विकासापासून वंचित राहिलेल्या भागास होणार आहे. याबाबत या भागातील नागारिकांकडून आ. बळवंत वानखडे यांचे आभार मानले.
===Photopath===
290621\1734-img-20210629-wa0004.jpg
===Caption===
दर्यापूर नगर परिषदेची हद्दवाढीस शासनाची मान्यता
आमदार बळवंत वानखडे यांच्या अथक प्रयत्नांना यश