शासनादेश पायदळी, मास्कची दामदुप्पट दराने विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 09:48 PM2020-10-30T21:48:23+5:302020-10-30T21:48:28+5:30

Corona Mask: कारवाई केव्हा ? : एन-९५ मास्क १०० ते १२५ रुपयांत

Government orders infantry, selling masks at double the rate | शासनादेश पायदळी, मास्कची दामदुप्पट दराने विक्री

शासनादेश पायदळी, मास्कची दामदुप्पट दराने विक्री

Next

संदीप मानकर

अमरावती : शासननिर्णयानुसार एन-९५ मास्कची किंमत १९ ते ४९ रुपये, तीन पदरी मास्क चार रुपये, तर दोन पदरी मास्क तीन रुपये असे दर जाहीर झाले. मात्र, यासंदर्भात शहरातील तीन मेडिकलमध्ये ते एन-९५ मास्क चक्क १०० ते १२५ रुपयांना विक्री होत असल्याचे ह्यरिॲलिटी चेकह्ण दरम्यान निदर्शनास आले. त्यामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या प्रतिष्ठानांविरुद्ध कारवाई केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे.


विशेषता! कुठल्याही केमिस्ट व ड्रगिस्टकडे नागरिकांना दिसेल अशा दर्शनी भागात मास्कच्या किमतीचे फलक लागलेले नव्हते. ह्यहम बोले सो कायदाह्ण अशी भूमिका मेडिकल स्टोअरच्या संचालकांची दिसून आली. १९ ते ४९ रुपयांना मिळणारे वेगवेगळ्या कंपनीचे मास्क १०० ते १२५ रुपयांना विक्री करीत असल्याचे त्यांनीच सांगितले. तीन पदरी मास्कचे दर चार रुपये शासनाने निश्चित केले असले तरी मेडिकल स्टोअरमध्ये ते ३० ते ३५ रुपयांना विकले जाते. दोन पदरी मास्क शासनिर्धारित तीन रुपयांऐवजी १० ते १५ रुपयाला विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. अशा ड्रगिस्ट व केमिस्टवर एफडीएचे अधिकारी कारवाई करतील का, हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

या ठिकाणी रिॲलिटी चेक

ह्यलोकमतह्ण प्रतिनिधीने शहरातील दोन चौकातील तीन मेडिकल स्टोअरमध्ये मास्कची किंमत विचारली. राजकमल चौकातील एका मेडिकलमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे एन-९५ मास्क हे १०० ते १२५ रुपयांना असल्याचे सांगण्यात आले. अन्य एका मेडिकलमध्ये एन ९५ मास्क १०० रुपयांना असल्याचे सांगण्यात आले.
नवीन आदेशाची माहिती आहे, मात्र, जुनाच स्टॉक शिल्लक असल्याने विक्री सुरू असल्याचे एका मेडिकल स्टोअरकडून सांगण्यात आले. कुठल्याही दर्शनी भागात किमतीचे फलक लावण्यात आले नव्हते. पंचवटी चौकातील एका मेडिकलमध्ये तीन पदरी मास्क ३५ रुपयांना, तर दोन पदरी मास्क १० ते १५ रूपयाला विक्री करण्यात येत होती.

मास्कचा प्रकार शासनाचे दर मेडिकलमध्ये विक्री
एन-९५ १९ ते ४९ रुपये             विक्री १०० ते १२५ रुपये

तीन पदरी ४ रुपये             विक्री ३० ते ३५ रुपये
दोन पदरी ३ रुपये             विक्री १० ते १५ रुपये


जुन्याच्या मालाची विक्री

शासनाने मास्क विक्रीसंदर्भात नवीन दर ठरविले. मात्र, आमच्याकडे जुन्या दरात खरेदी केलेले मास्क शिल्लक असल्याने एन -९५ मास्क १०० रुपयांना विकावे लागत आहे. अद्याप नवीन मास्क खरेदी केले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मास्कची मागणी घटली. यानंतर शासन नियमांचे पालन करू, असे एका मेडिकल संचालकाने सांगितले.

Web Title: Government orders infantry, selling masks at double the rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.