बांगलादेशने संत्र्यावरचा आयात कर कमी करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:17 AM2021-06-16T04:17:53+5:302021-06-16T04:17:53+5:30
वरूड : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या तसेच बांगलादेशने आयात कर वाढविल्यामुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीला अनुसरून वर्धा मतदारसंघाचे खासदार रामदास ...
वरूड : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या तसेच बांगलादेशने आयात कर वाढविल्यामुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीला अनुसरून वर्धा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांनी केंद्रीय वाणिज्य व रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत पत्र देऊन विनंती केली.
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून वर्षाला सरासरी दीड लाख मॅट्रिक टन संत्रा बांगलादेश ला जात असतो . बांगलादेश ने २०२१-२२ पासून आयात कर वाढविल्यामुळे शेतकऱ्याना निर्यात करण्याकरिता अडचण निर्माण झाली आहे. यामुळे विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा विदेशात पाठविणे काहीं झाले . बांगलादेशात मोठ्या प्रमाणात वरुड तालुक्यातून संत्राची निर्यात केली जाते. बांगलादेशाने आयात कर मोठ्या प्रमाणात वाढविल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यापुढे मोठे संकट निर्माण झाले आहे . याकरिता ऑल इंडिया इंडो बांगला संत्रा निर्यात संघ वरुड, माजी कृषी मंत्री . अनिल बोंडे , आ . देवेंद्र भुयार तसेच अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून खा.श्री . रामदास तडस यांना आयात कर संबंधीचे निवेदन देण्यात आली होती . या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या विषयावर योग्य कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी केंद्रीय वाणिज्य व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या कडे चर्चा करून तसे पत्र खा. रामदास तडस यांनी दिले . केंद्रीय वाणिज्य मंत्र्यासोबत झालेल्या चर्चे दरम्यान वर्तमान परिस्थिती बाबत अवगत केले. आयात कर कमी करण्याचा निर्णय बांगलादेशला घ्यायचा असल्याने भारत सरकार निश्चितच शेतकऱ्याची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याकरिता संत्रा उत्पादन शेतकऱ्यांना सहकार्य करेल अशी ग्वाही दिल्याचे खा.रामदास तडस यांनी सांगितले .