जखमी मोरासाठी रविवारीही उघडला सरकारी दवाखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:04 PM2018-05-20T23:04:34+5:302018-05-20T23:04:45+5:30

छत्रीतलाव परिसरात पाणी पिण्यासाठी आलेल्या मोरावर भटक्या श्वानांनी हल्ला चढवून जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. काही वन्यप्रेमींना हा प्रकार दिसल्याने मोराचे प्राण वाचले. जखमी मोराच्या उपचारासाठी रविवारी सरकारी पशुचिकित्सालय उघडून उपचार करण्यात आले.

Government ward office opened on Sunday for injured peacock | जखमी मोरासाठी रविवारीही उघडला सरकारी दवाखाना

जखमी मोरासाठी रविवारीही उघडला सरकारी दवाखाना

Next
ठळक मुद्देश्वानांचा मोरावर हल्ला : छत्री तलावावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : छत्रीतलाव परिसरात पाणी पिण्यासाठी आलेल्या मोरावर भटक्या श्वानांनी हल्ला चढवून जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. काही वन्यप्रेमींना हा प्रकार दिसल्याने मोराचे प्राण वाचले. जखमी मोराच्या उपचारासाठी रविवारी सरकारी पशुचिकित्सालय उघडून उपचार करण्यात आले.
शनिवारी सकाळी छत्री तलावावर वन्यजीव छायाचित्रकार मनोज बिंड आणि त्यांच्या सहकारी पक्ष्यांचे निरीक्षण करीत होते. श्वानांचा कळप मोराचा पाठलाग करताना दिसले. त्यांनी मोराला श्वानाच्या तावडीतून सोडविले. याची माहिती वसा संस्थेच्या बर्ड्स रेस्क्यू हेल्पलाईनला दिली. बर्ड्स रेस्क्युअर रोहित रेवाळकर आणि गणेश अकर्ते यांनी सदर मोराला पकडून डॉ. पोटफोडे यांच्याकडे नेले. मोरावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पशु वैद्यकीय चिकित्सालयात दाखल केले. पशु शैल्यचिकित्सक अनिल कळमकर यांनी मोरावर उपचार सुरू केले. उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी वाजगे यांनी पुढील उपचारासाठी त्याला वसा संस्थेकडे सुपूर्द केले.

Web Title: Government ward office opened on Sunday for injured peacock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.