राज्यपाल चिखलदऱ्यात मुक्कामी

By admin | Published: November 2, 2015 12:26 AM2015-11-02T00:26:13+5:302015-11-02T00:26:13+5:30

राज्यपाल सी. विद्यासागर राव सोमवारी विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर एक दिवसाच्या मुक्कामाने येत आहेत.

Governor pauses in Chikhaldara | राज्यपाल चिखलदऱ्यात मुक्कामी

राज्यपाल चिखलदऱ्यात मुक्कामी

Next

तयारी पूर्ण : पोलिसांचा तगडा बंदोबस्त
चिखलदरा : राज्यपाल सी. विद्यासागर राव सोमवारी विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर एक दिवसाच्या मुक्कामाने येत आहेत. ते येथील विविध स्थळांना भेटी देण्यासोबत चर्चा, पाहणी व आढावा घेणार असल्याने रविवारी प्रशासनाने त्यांच्या आगमनापूर्वी अंतिम तयारीची बैठक घेतली.
राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव सोमवारी २ नोव्हेंबरला चिखलदरा येथे एक दिवसीय मुक्कामी दौऱ्यावर येत आहे. मेळघाटात राज्य शासनातर्फे पुरविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यासोबत मोथा येथे स्ट्रॉबेरी शेती, आमझरीला वन विभागाच्या इकोटुरीझम सेंटरला भेट देण्यासोबत कुपोषणाबद्दल बैठक, चिखलदरा पर्यटन स्थळावरील पंचबोल पॉर्इंटला भेट व रात्री मुक्कामी राहणार आहेत. मंगळवारी ३ नोव्हेंबर रोजी येथील गाविलगड किल्ल्यावर भेट देऊन अमरावती येथे जाणार आहे.

Web Title: Governor pauses in Chikhaldara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.