राज्यपालांनी पाठविला गाडगेबाबांचा पूर्णाकृती पुतळा

By Admin | Published: February 22, 2016 12:51 AM2016-02-22T00:51:34+5:302016-02-22T00:51:34+5:30

२६ फे ब्रुवारी रोजी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री संत गाडगे बाबांचे जन्मस्थळ शेंडगावात येत आहेत.

The Governor sent a statue of Gadgebaba | राज्यपालांनी पाठविला गाडगेबाबांचा पूर्णाकृती पुतळा

राज्यपालांनी पाठविला गाडगेबाबांचा पूर्णाकृती पुतळा

googlenewsNext

नरदोड्यालाही भेट : २६ फेब्रुवारीला मुख्यमंत्री शेंडगावात
अमरावती : २६ फे ब्रुवारी रोजी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री संत गाडगे बाबांचे जन्मस्थळ शेंडगावात येत आहेत. राजपाल सी. विद्यासागर राव यांनी स्वखर्चाने शेंडगाववासीयांना संत गाडगे बाबांचा पुर्णकृती पुतळा सप्रेम भेट दिला आहे. त्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री शेंडगावात येणार असल्याची चर्चा होती. परंतु सदर दौरा रद्द झाला असून तो पुढे ढकलून २६ फेब्रुवारीला ठरला आहे. महामहिम राजपाल सी. विद्यासागर राव जेव्हा मेळघाटच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबांच्या जन्मस्थळी त्यांचा पुतळा बसविणार असल्याची इच्छा व्यक्त केली होती. पूर्णाकृती पुतळयाची मूर्ती जे. जे. स्कूल आॅफ आटर््स मुंबईमध्ये तयार करण्यात आला आहे. हा पुतळा तीन दिवसांपूर्वीच दर्यापूर उपविभागीय कार्यालयाला प्राप्त झाला आहे.
भुलेश्वरी नदीच्या तिरावर संत गाडगे बाबांचा पुतळा उभारण्यात येणार या कार्यक्रमाकरिता शेंडगावासी सज्ज झाले असून प्रशासनसुध्दा तयारीला लागला आहे. तसेच या ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेअंर्तगत भुलेश्वरी नदीवर तीन गेबीयन बंधारे बांधण्यात आले आहे. त्यांची पाहणीसुध्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. त्यानंतर दर्यापूर तालुक्यातील नरदोडा येथे मुख्यमंत्री भेट देणार आहेत. या ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेतील हवाई पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The Governor sent a statue of Gadgebaba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.