गोविंदपूर ग्रामपंचायत ठरली जिल्ह्यातील सुंदर ग्रामपंचायत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:35 AM2021-02-20T04:35:28+5:302021-02-20T04:35:28+5:30
पान २ ची बॉटम चांदूर बाजार : शासनाच्या ग्रामविकास विभागात कडून आर.आर. पाटील सुंदर गाव योजनेंतर्गत जिल्हा ...
पान २ ची बॉटम
चांदूर बाजार : शासनाच्या ग्रामविकास विभागात कडून आर.आर. पाटील सुंदर गाव योजनेंतर्गत जिल्हा व तालुका पातळीवर ग्रामपंचायतींची निवड करून सन्मान केला जातो. यंदा हा बहुमान तालुक्यातील गोविंदपूर ग्रामपंचायतीला मिळाला आहे. ही ग्रामपंचायत तालुकास्तरावर प्रथम आली. अचलपूर तालुक्यातील सावळी दातुरा या ग्रामपंचायतीसह संयुक्तरीत्या जिल्हास्तरीय पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात सन २०१९-२० या कालावधीत ही योजना राबवण्यात आली होती. यामध्ये गोविंदपूर ग्रामपंचायतीने समाजोपयोगी उपक्रम राबविताना प्रशासकीय नियम व अटींचे पालन करून गावक०यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. यामध्ये स्वच्छ गाव, सांडपाणी व्यवस्थापन, दररोज गावामध्ये घंटा गाडी फिरून गावातील कचरा जमा करणे, मादक द्रव्य बंदी, प्लास्टिक बंदी, व्यायाम शाळा, वाचनालय, उद्यान, ‘आपले सरकार’मार्फत देण्यात येणाºया सर्व सुविधा गावात उपलब्ध करून दिल्या. सांडपाण्याचा सिंचनाकरिता वापर, वनराई बंधारा, कचरा व्यवस्थापन, गावकºयांना शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले. तसेच ६ हजार ५०० सीताफळ व इतर फळझाडांसह १६ हजार वृक्षलागवड असे विविध उपक्रम राबवून आपले गाव सुंदर केले.
तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय समितीमार्फत गावाची पाहणी तसेच अभिलेख्यांची व गुणांची पडताळणी करून ग्रामपंचायतींना पात्र ठरविण्यात आले. यामध्ये गोविंदपूर ग्रामपंचायतीचा कारभार उत्तम ठरला. गाव सुंदर करण्याकरिता गटविकास अधिकारी प्रफुल भोरखडे, ग्राम विस्तार अधिकारी ईश्वर सातंगे यांच्या मार्गदर्शनात नागरिक, सरपंच सुषमा सोलव, उपसरपंच अरविंद मोहोड, वर्षा डोफे, योगेश सोलव, अरविंद धामदे, प्रमिला वाघमारे व ग्रामसेवक सुरेश रेखाते परिश्रम घेतले.
----------
फोटो पी १९ शिंगणापूर
शिंगणापूर ग्रामपंचायत तालुक्यातून प्रथम
दर्यापूर : तालुक्यातील लोकसंख्येने मोठी असलेली व काळा मारोती देवस्थानाकरिता प्रसिद्ध असलेली ग्रामपंचायत म्हणजे शिंगणापूर. आर आर पाटील सुंदर ग्राम योजनेत या ग्रामपंचायतने तालुकास्तरावर पहिला क्रमांक पटकाविला आहे.
येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्राम सचिव भुषण बांते यांच्या परिश्रमाने गावात १०० टक्के वृक्षलागवड, गोबरगॅस सयंत्र, कुपोषण प्रमाण शून्य टक्के, शाळा गळती, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, परिसर साफ सफाई, झाडांना नंबर, हातपंप शोषखडा, जल व मृद संधारण कामे करण्यात आली. तसेच गावातील मूलभूत सुविधा, ग्रामपंचायत लेखे संगणिकृत करण्यात आले. स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करण्यात आले. याकामी सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा वर्कर, जिल्हा परिषद शाळा मुख्याधापक, शिक्षक, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक, प्रशासक एन. एन. बेराड, विस्तार अधिकारी मुळे, कुलकर्णी व गावातील समस्त नागरिक यांनी सहकार्य केले. गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
------------