शासकीय दूध योजना, शीतकरण केंद्र मरणासन्न अवस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 03:54 PM2023-08-18T15:54:11+5:302023-08-18T15:55:22+5:30

शीतकरण केंद्रांची कालबाह्य झालेली यंत्रसामग्री भंगारात काढण्याचा निर्णय

Govt milk scheme, cooling center in moribund condition | शासकीय दूध योजना, शीतकरण केंद्र मरणासन्न अवस्थेत

शासकीय दूध योजना, शीतकरण केंद्र मरणासन्न अवस्थेत

googlenewsNext

मनीष तसरे

अमरावती : राज्यभरातील दूध योजना, जिल्ह्यातील मोर्शी, चांदुर रेल्वे, अचलपूर, सिमाडोह या ठिकाणी दुध शीतकरण केंद्रांची केंद्रे मरणासन्न अवस्थेत पाहायला मिळत असून, याला केंद्र आणि राज्यातील शासनाचे खुल्या आर्थिक धोरण कारणीभूत ठरत आहेत. गेल्या काही वर्षांत खासगी, सहकारी संघ आणि संस्थांनी सुरू केलेल्या दुग्ध प्रकल्पांना शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचा फायदा मिळत आहे. त्यामुळे शासकीय दूध योजना आणि शीतकरण केंद्रे अक्षरशः बंद पडली आहेत. त्यामुळे आता शासकीय दूध योजना आणि शीतकरण केंद्रांची कालबाह्य झालेली यंत्रसामग्री भंगारात काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांकडून दुधाच्या व्यवसायाला पर्याय दिला जातो. त्यामुळे याच शेतकऱ्यांना अधिकचा फायदा व्हावा म्हणून १९६४ मध्ये अमरावतीच्या कॉग्रेस नगर मध्ये जवळपास साडेचार एक्कारात दूध योजना सुरू करण्यात आली होती. कधीकाळी दिवसाला हजारो लिटर दूध संकलन होत होते मात्र कालंतराने दुध संकलन कमी व्हायला लागले. त्यामुळे मार्च २०२२ मध्ये अमरावती मधील दुध संकलन केंद्र व योजना बंद करण्यात आले.

Web Title: Govt milk scheme, cooling center in moribund condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.