अन् उघडली ग्रा.पं., तलाठी कार्यालयाची दारे !
By admin | Published: November 6, 2015 12:19 AM2015-11-06T00:19:03+5:302015-11-06T00:19:03+5:30
जिल्ह्यात शुक्रवारपासून आलेल्या पंचायतराज समितीचा धसका ग्रामपंचायतीपासून तर जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ
नरेंद्र जावरे ल्ल चिखलदरा
जिल्ह्यात शुक्रवारपासून आलेल्या पंचायतराज समितीचा धसका ग्रामपंचायतीपासून तर जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतल्याचे चित्र आहे. महिन्यातून एखाद्या दिवशी कधीकाळी उघडणारे ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाची दारे मागील चार दिवसांपासून सताड उघडी असल्याचे संतोषजनक चित्र मेळघाटवासीयांचे मनोरंजन करणारे ठरले आहे.
पंचायतराज समितीचा दौरा गत महिन्यात रद्द झाल्यावर पुन्हा नव्याने नव्या तारखेसह जाहीर झाला. रद्दमुळे सुटकेचा नि:श्वास टाकलेल्या भ्रष्ट व कामचुकार कर्मचारी अधिकाऱ्यांची लगीनघाई चांगलीच चर्चेत आली आहे.
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील बोटावर मोजके ग्रामसेवक आणि तलाठी वगळता मोठ्या प्रमाणात दुर्गम आणि अतिदुर्गम भागात काम करणारे कर्मचारी महिन्यकाठीच गावात दिसत असल्याचे सत्य आहे. शुक्रवार ६ नोव्हेंबरपासून पंचायतराज समितीचा दौरा, जिल्हास्थळावरून वेगवेगळ्या चमू तयार करून सुरुवात होणार आहे. वेगवेगळ्या तालुक्यात समिती जाणार असली तरी मुंबईपासून सर्वांचा निशाणा मेळघाटवर असतो. कोट्यवधी रुपयांची कामे विविध योजनेंतर्गत करण्यात येत असताना विकासाचा अनुशेष कायमच आहे.
परतवाडा, अमरावतीमधून कारोभार
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील सचिव, तलाठी, शिक्षक, आरोग्य विभागाचे व इतर ग्रामस्तरावर काम करणारे कर्मचारी परतवाडा आणि अमरावती येथून कामकाज करीत असल्याचा शेकडो तक्रारीवर धूळ साचली आहे. ग्रामसेवकांकडून आवश्यक दाखले घेण्यासाठी आदिवासींना परतवाडा येथे यावे लागत असल्याचे सत्य आहे. परिणामी गाव विकासासाठी मंत्रालय असलेले ग्रामपंचायत कार्यालय पंचायत राजमध्ये लाखो रुपयांचा येत असलेल्या निधीची कशी विल्हेवाट लावतात, याची तपासणी पंचायत राज समितीने करण्याची गरज आहे. काही ग्रामसेवक तर आठवडी बाजारच्या दिवशी गावात येथून दर्शन देत असल्याची तक्रारच युवक काँग्रेसचे पियुष मालवीय व राहूल येवले पंचायत राज समितीपुढे करणार आहेत.
-आणि दारे उघडली
४मेळघाटात पंचायतराज समिती, आदिवासी विकास समिती, विधिमंडळ सचिवांचे दौरे, मंत्र्यांचे दौरे, राज्यपाल आणि मुख्यमंत्री आदींच्या आगमन व प्रस्थानासोबत राष्ट्रीय सण आदी दिवशी ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय उघडण्याची जुनी पद्धत आहे. त्याच परंपरेला कायम ठेवीत गत चार महिन्यांपासून बेपत्ता कर्मचारी मेळघाटात फिरकले आहेत. सचिवांच्या वेतनासाठी सरपंचाची स्वाक्षरी आवश्यक असताना अनेक ठिकाणी बनावट स्वाक्षरी तर कुठे, सरपंचाला रोख आमिष देत हजेरी पत्रक भरून ग्रामसेवक आपले उखळ पांढरे करीत असल्याचे चित्र मेळघाटात जुने आहे.
'सब कुछ अपडेट', कलरफुल
४पंचायत राज समितीचा दौरा पाहता, चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ प्राथमिक पंचायत आरोग्य केंद्राची रंगरंगोटी करण्यात आली. पंचायत राज समितीच्या दौऱ्यामुळे जणू दिवाळीच आल्याचा भास मेळघाटात होत आहे. तर कुलूप बंद किंवा कधीकाळी दिसणारे ग्रामसेवकसुद्धा हजर असल्याचे चित्र बरेच बोलके आहे. काटकुंभ - चुरणी, हतरू हा चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम परिसर असून वरिष्ठ अधिकारी सध्या या परिसराकडे फिरकत नाही. त्यामुळे त्यांचे चांगलेच फावत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे अनेक शाळांमधील बेपत्ता शिक्षक हजर झाले असून शाळांना सुद्धा रंगरंगोटी केली जात असल्याचे चित्र आहे.
मेळघाटातील आदिवासींना दाखल्यासाठी परतवाडा येथे जावे लागते. कार्यालय ठराविक दिवसच उघडे राहते. पीआरसीमुळे कधी न दिसणारे कर्मचारी मेळघाटात दिसत आहे. याची तक्रार समितीपुढे करु.
- पीयूष मालवीय, सचिव युवक काँग्रेस, चिखलदरा.
प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वतंत्र ग्रामसेवक देण्याच्या सूचना कायद्यांतर्गत असून त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी.
- महेपतसिंग उईके,
सामाजिक कार्यकर्ता, डोमा.
एक गडी तीन भानगडी
४मेळघाटातील ग्रामसेवकांकडे तीन ग्रामपंचायतींचा पदभार असल्याने आपण त्या ग्रामपंचायतीला होतो. अशी वेळ मारून बेपत्ता राहण्याची शासकीय सोय उपलब्ध असल्याचा आदिवासींचा आरोप आहे.