विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीकडून १८३२ जणांना पदवी प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:12 AM2021-08-01T04:12:36+5:302021-08-01T04:12:36+5:30

फोटो - बडनेरा ३१ एस पदवीदान समारंभ, सात विद्यार्थ्यांना सुवर्णपदके, ५२ गुणवंत, ३७६ पदव्युत्तर पदवीधर, ३० कलरकोट बडनेरा : ...

Graduation of 1832 persons from Vidarbha Youth Welfare Society | विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीकडून १८३२ जणांना पदवी प्रदान

विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीकडून १८३२ जणांना पदवी प्रदान

Next

फोटो - बडनेरा ३१ एस

पदवीदान समारंभ, सात विद्यार्थ्यांना सुवर्णपदके, ५२ गुणवंत, ३७६ पदव्युत्तर पदवीधर, ३० कलरकोट

बडनेरा : विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारे संचलित सर्व महाविद्यालयांचा पदवीदान वितरण समारंभ कोविडमुळे यंदा ऑनलाईन पार पडला. हा शैक्षणिक संस्थास्तरावर सर्वांत मोठा ऑनलाईन पदवी वितरण कार्यक्रम ठरला आहे.

कार्यक्रमाला विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष उदय देशमुख, कोषाध्यक्ष हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी, संचालक मंडळातील कार्यकारी सदस्य शंकरराव काळे, नितीन हिवसे, रागिणी देशमुख, वैशाली धांडे, पूनम चौधरी तसेच प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्चचे प्राचार्य अमोल बोडखे, प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य एम.एस. अली, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य तुलसीराम राठोड, कला व वाणिज्य महाविद्यालय चांदूर (रेल्वे) च्या प्राचार्य सीमा जगताप, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य लीना कांडलकर, दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. राजेश गोंधळेकर, बॅरि. आर.डी.आय.के. अँड एन.के.डी. महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश देशमुख, प्रा. राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालय नांदगाव (खं.) येथील प्राचार्य प्यारेलाल सूर्यवंशी व कार्यक्रम समन्वयक गजेंद्र बमनोटे यावेळी उपस्थित होते. १८३२ जणांना पदवी प्रदान करण्यात आल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. संस्थेच्या सात विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके, ५२ जणांनी गुणवंत यादी, ३७६ जणांनी पदव्युत्तर पदवी, ३० जणांनी कलरकोट प्राप्त केले आहेत. संचालन निकू खालसा, मैथिली देशमुख व पूनम लोहिया यांनी केले. शिक्षक, विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.

Web Title: Graduation of 1832 persons from Vidarbha Youth Welfare Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.