राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळी ग्रामजयंती महोत्सव प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:12 PM2019-04-29T23:12:33+5:302019-04-29T23:12:52+5:30

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून महासमाधीस्थळी यंदाही ग्रामजयंती महोत्सव साजरा होत आहे .

Gram jayanti festival begins in Rashtrapati Mahasamadhi | राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळी ग्रामजयंती महोत्सव प्रारंभ

राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळी ग्रामजयंती महोत्सव प्रारंभ

Next
ठळक मुद्देआज सांगता : शेतकरी, सैनिकांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
गुरुकुंज मोझरी : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून महासमाधीस्थळी यंदाही ग्रामजयंती महोत्सव साजरा होत आहे .
२७ ते ३० एप्रिलपर्यंत हा महोत्सव होत आहे. ३० ला पहाटे ५ वाजता सामुदायिक ध्यान व त्यावर प्रचारप्रमुख दामोधर पाटील यांचे चिंतन होईल. सकाळी ६ ते ८ या कालावधीत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची शोभायात्रा गुरुदेवनगरातून काढण्यात येईल. यात समस्त गुरुदेवभक्त सहभागी होतील. सकाळी ११ ते १२ वाजता दरम्यान ग्रामनाथ शेतकरी व देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांसह शेतकरी दिलीपराव तिखे, भीमराव वसू, श्रीधर बायस्कर, राजेंद्र घोगरे, धनराज केने, भारतीय सेनेतील असिस्टंट कमांडन्ट चेतन शेलोटकर व सैनिक श्रीकांत प्रधान यांचा सत्कार केला जाईल. दुपारी १२ ते ३ या दरम्यान महाप्रसाद असेल. सायंकाळी सामुदायिक प्रार्थना चिंतन, रात्री ७.४५ ते ८.३० पर्यंत लटारे महाराज भजन मंडळ कारंजा घाडगे यांचे खंजेरी भजन, रात्री ८.३० वाजता भक्तीरंग कार्यक्रम किशोर अगडे, नीलेश इंगळे व संच सादर करतील. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाचा समारोप होईल.

Web Title: Gram jayanti festival begins in Rashtrapati Mahasamadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.