अमरावती महापालिका की ग्रामपंचायत? विरोधी पक्षनेत्यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:09 AM2021-06-30T04:09:23+5:302021-06-30T04:09:23+5:30
(लोगो) अमरावती : महावितरणद्वारे शहरातील काही भागांतील पथदिवे सोमवारी देयकाच्या थकबाकीमुळे बंद केल्यानंतर महापालिकेचे वातावरण तापले आहे. अमरावती ही ...
(लोगो)
अमरावती : महावितरणद्वारे शहरातील काही भागांतील पथदिवे सोमवारी देयकाच्या थकबाकीमुळे बंद केल्यानंतर महापालिकेचे वातावरण तापले आहे. अमरावती ही महापालिका की ग्रामपंचायत आहे, असा थेट सवाल विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांनी आयुक्तांना मंगळवारी निवेदनाद्वारे केला.
मार्च ते मे महिन्यातील थकीत २.६५ कोटींच्या देयकासाठी महावितरणद्वारे हे पाऊल उचलण्यात आले. तासभर का होईना, शहराचा अर्धा भाग अंधारात होता. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी कोणावर ठेवायची होती, असा सवालदेखील त्यांनी महापालिका प्रशासनाला केला. कधी महापालिकेचे पथदिवे बंद राहतात, तर कधी महापालिकेच्या वाहनाला पेट्रोल पंपावर थकीत देयकामुळे पेट्रोल नाकारले जाते. महापालिकेची उत्पन्नवाढ करण्याची जबाबदारी ही प्रशासनासोबत सत्तापक्षाची असताना नियोजनाअभावी अमरावतीकरांचे हाल होत आहेत. महापालिका क्षेत्रात नागरिकांच्या जिवाशी खेळ होत असल्याचा घणाघात शेखावत यांनी केला.
महापालिका नागरिकांकडून मालमत्ताकराची वसुली करत असताना सुविधा मात्र ग्रामपंचायतींइतपतच आहेत. याला सत्तापक्ष दोषी आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा शेखावत यांनी प्रशासनाला दिला आहे.
बॉक्स
महावितरण कुणाच्या इशारावर ॲक्टिव्ह?
दोन्ही विभाग शासनाचेच असताना महावितरणने कुणाच्या इशाऱ्यावर पथदिव्याचा पुरवठा खंडित केला. महिला, मुली बाहेर असताना सर्वत्र अंधार असल्याने पालकांची चिंता वाढली होती, असे शेखावत म्हणाले. महावितरणकडे एलबीटीची १२ कोटींवर रक्कम थकीत असताना शहरातील पथदिव्यांचा पुरवठा का खंडित केला, असा सवाल त्यांनी केला.
कोट
महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याची व त्यासाठी नियोजन करण्याची जबाबदारी सत्तापक्षाची असताना काहीच केले जात नाही. महापालिकेचा मालमत्ता कर वसूल करीत असताना नागरिकांना सुविधा मात्र ग्रामपंचायतीपेक्षा खराब दिली जात असल्याने जाब विचारणार आहोत.
- बबलू शेखावत, विरोधी पक्षनेता
कोट
०००००००००००००
०००००००००००००००००००००
चेतन गावंडे
महापौर