जिल्ह्याला ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध
By Admin | Published: June 12, 2017 12:22 AM2017-06-12T00:22:11+5:302017-06-12T00:22:11+5:30
जिल्ह्यात डिसेंबर २०१७ मध्ये ग्रामपंचायतींची मुदत संपत असून या ग्रामपंचायतींना आता निवडणुकीचे वेध लागले आहे.
१ जुलैपर्यंत नाव नोंदणी : ग्रा.पं. संपणार मुदत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात डिसेंबर २०१७ मध्ये ग्रामपंचायतींची मुदत संपत असून या ग्रामपंचायतींना आता निवडणुकीचे वेध लागले आहे. निवडणूक विभागाने या निवडणुकीसाठी मतदार यादी निश्चित करण्याचे काम हाती घेतले असून १ जुलै २०१७ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना आपली नावे मतदार यादीत नोंदविता येणार आहेत.
निवडणूक विभागाने मतदार यादी तयार करण्याच्या कामाला सुरूवात केली असल्याने राजकीय पक्ष, संभाव्य उमेदवार, सरपंच, उपसरपंच यांच्यासह सर्वांनीच ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व राहावे यासाठी मोर्चेबांधणीला आतापासूनच सुरूवात केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच नगरपंचायत निवडणुकांचा रणसंग्राम संपल्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांची लगबग सुरू होईल. जिल्ह्यात एकूण ८३९ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी काही ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर २०१७ मध्ये संपत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर निवडणूक विभागाने मतदार याद्यांचा नूतनीकरण सुरू केले आहे. यासाठी १ जुलै २०१८ ही अंतिम तारीख निश्चित करीत या तारखेपूर्वी ते आपले नावे मतदार यादीत नोंद करतील अशांनाच आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मतदान करता येणार आहे अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या असून जिल्हा निवडणूक विभागाकडून तशी प्रक्रिया सुरू झाली आहे.
सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी
जिल्ह्यात एकूण ८३९ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी काही ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर २०१७ मध्ये संपत आहेत. सर्वच राजकीय पक्ष, संभाव्य उमेदवार, विद्यमान सरपंच, उपसरपंच यांच्यासह सर्वांनीच ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व राहावे, यासाठी मोर्चेबांधणीला आतापासून सुरूवात केली आहे.