ग्रामपंचायत निवडणूक : शेतकºयांनी भाजपला नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:54 PM2017-10-17T23:54:40+5:302017-10-17T23:55:27+5:30

जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींसाठी पार पडलेल्या मतमोजणीनंतर भाजपक्षासाठी 'बुरे दिन' आल्याचे स्पष्ट झाले.

Gram panchayat elections: The farmers rejected the BJP | ग्रामपंचायत निवडणूक : शेतकºयांनी भाजपला नाकारले

ग्रामपंचायत निवडणूक : शेतकºयांनी भाजपला नाकारले

Next
ठळक मुद्देपुन्हा काँग्रेस

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींसाठी पार पडलेल्या मतमोजणीनंतर भाजपक्षासाठी 'बुरे दिन' आल्याचे स्पष्ट झाले. देश काँग्रेसमुक्त करण्याच्या भाजपाच्या इराद्यांना अमरावतीच्या ग्रामीण जनतेने सुरूंग लावला आहे. तब्बल १३४ सरपंच निवडून आल्याची माहिती काँग्रेसने पत्रपरिषदेतून दिली. ही टक्केवारी ५४ इतकी होते. भाजपक्ष दावे मोठे करीत असला तरी अधिकृत पत्रपरिषद मात्र त्यांनी घेण्याचे टाळले.
जिल्ह्यात २४९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ९८२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ७९३ प्रभागांतून २,०५९ सदस्यपदांसाठी ३,२६४ उमेदवार रिंगणात होते. सकाळी ११ नंतर सरपंचपदाचे निकाल जाहीर होताच जनतेने काँग्रेसला कौल दिल्याचे स्पष्ट झाले.
केवळ काँग्रेसचे आमदार असणाºया मतदारसंघातच नव्हे, तर बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस समर्थित सरपंचांनी बाजी मारल्याचे चित्र स्पष्ट झाले. दुपारनंतर आलेल्या निकालात दुसºया स्थानी भाजपसमर्थित सरपंच निवडून आलेत. प्रहार, शिवसेना, युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्षांसह स्थानिक आघाड्यांचीही काही ठिकाणी सरशी झाली आहे. बडनेरा मतदारसंघात आमदार रवी राणाप्रणित युवा स्वाभिमान पार्टीने १२ जागांवर विजय मिळविला.

चांदूर रेल्वे मतदारसंघात विजयाचे दावे-प्रतिदावे
थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या राजकीय वर्चस्वाचे दावे प्रतिदावे केले. दरम्यान, चांदूर रेल्वे मतदारसंघात सर्वाधिक जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या आहेत़ या मतदारसंघातील तीनही तालुक्यांमध्ये शेवटच्या टप्प्यात राजकीय रंग चढला़ काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी धामणगाव तालुक्यात ५, नांदगाव खंडेश्वर ९ व चांदूर रेल्वे तालुक्यात १० सरपंचपदाचे विजयी उमेदवार काँग्रेसचे असल्याची माहिती दिली. धामणगावचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी नांदगाव खंडेश्वरमध्ये भाजपने ९, चांदूर रेल्वे ९, धामणगाव रेल्वे तालुक्यात ४ जागा काबीज केल्याचा दावा केला आहे.

वरुड-मोर्शीची सोशल मीडियावर चर्चा
जिल्ह्यात सर्वत्र क ाँग्रेस विजयी झाल्याची चर्चा होती, तर विदर्भासह संपूर्ण राज्यात भाजपने मतदारसंघनिहाय आकडे जारी करून विजय मिळविल्याचा फार्स निर्माण केला. मोर्शी-वरुड तालुक्यात १५ जागांवर विजय मिळविल्याचे संदेश राज्यभर फिरत होते. प्रत्यक्षात मोर्शी व वरुड तालुक्यात अनुक्रमे २४ व २३ अशा एकूण ४७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यात भाजपचा १५ जागांचा दावा असला तरी ५० टक्क््यांचा आकडाही पार केला नव्हता. वरुड तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने १८ जागा जिंकल्याचा दावा केला. मोर्शी तालुक्यात ११ जागांवर काँग्रेस समर्थित उमेदवारांनी विजय मिळविला.

१५९ सरपंच, भाजपचा दावा
काँग्रेसने सरपंचपदाचे १३४ उमेदवार निवडून आल्याचे पत्रपरिषदेत जाहीर केल्यावर एका अंकाने सरस असल्याचा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी केला. त्यांनी भाजपचे १३५ उमेदवार विजयी झाले असल्याची माहिती दिली. सोबतच त्यांनी भाजपा व मित्रपक्ष मिळून एकूण १५९ सरपंच असल्याचा दावा केला. आम्ही बुधवारी सर्व १५९ सरपंचांना शपथपत्रासह हजर करणार असल्याचे ते म्हणाले. तिवसा, भातकुली, चांदूर रेल्वे या तालुक्यांत पिछाडीवर असल्याचे त्यांनी मान्य केले.

भाजप सर्वत्र
पिछाडीवर
धारणी तालुका वगळता भाजपने दणदणीत यश मिळविल्याचा दावा केला नाही. चांदूरबाजार, अचलपूर तालुक्यात प्रहारला यश मिळाले. काँग्रेसचे अस्तित्व तेथेही आहेच. तिवसा, धामणगाव, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, भातकुली, वरुड व मोर्शी या तालुक्यांत काँग्रेसने निर्विवाद विजय मिळविला आहे.

कॉग्रेस आमदारांचा करिश्मा कायम
आमदार यशोमती ठाकूर यांच्या तिवसा व आमदार वीरेंद्र जगताप यांच्या चांदूर रेल्वे मतदारसंघात काँग्रेसने सर्वाधिक जागांवर विजय मिळविला आहे. मोदी लाटेतही काँग्रेसच्या या दोन नेत्यांनी आमदारकीत देखणा विजय मिळविला होता. पुढे ही परंपरा विविध निवडणुकांत कायम ठेवत आता थेट सरपंचपदाच्या निवडणुकांमध्येही त्यांनी स्वनेतृत्वाचा ठसा उमटविला आहे.

Web Title: Gram panchayat elections: The farmers rejected the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.