ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर
By admin | Published: April 19, 2016 12:03 AM2016-04-19T00:03:00+5:302016-04-19T00:03:00+5:30
जिल्ह्यात मे ते आॅगस्ट २०१६ दरम्यान कालावधी संपुष्टात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांच्या ३४ सदस्यपदांचे निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाले.
कहीं खुशी कहीं गम : ३४ उमेदवार पूर्वीच अविरोध, नामांकन अर्जाअभावी ६७ जागा रिक्त
अमरावती : जिल्ह्यात मे ते आॅगस्ट २०१६ दरम्यान कालावधी संपुष्टात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांच्या ३४ सदस्यपदांचे निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाले. या निवडणुकीत ३४ उमेदवार यापूर्वीच अविरोध निवडून आले आहेत, तर उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ६७ सदस्यांची पदे रिक्त राहिलीत.
सोमवारी सकाळी संबंधित तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यात आलेत. यामध्ये तिवसा तालुक्यामधील घोटा ग्रामपंचायतीमध्ये विनोद बाबूलाल राठोड, शकुंतला धनराज इंगोले, पंकज प्रभाकर राऊत, प्रतिभा हनुमंत सैरीसे, इंद्रपाल धनराज चव्हाण, वंदना सुरेश रताळे विजयी झाले. कवडागव्हाण ग्रामपंचायतीमध्ये हरीश अंबादास गायकवाड, राजेश बाबूराव चौधरी, केशव विठोबा चौधरी, जयश्री वासुदेव चौधरी हे विजयी झाले आहेत. उंबरखेड ग्रामपंचायतीमध्ये कैलास विघ्ने, प्रांजली कळंबे, सोपान फाले, सारिका यादव, सुरेखा कळंबे विजयी झालेत. आखतवाडा येथे उल्का मानेकर, वणी येथे निर्मला बोबडे, धामणगाव तालुक्यात जळगाव येथे कविता रणवीर, वरुड तालुक्यात बेनोडा येथे ज्योत्सना पोटोळे, सावर्डी येथे वैभव खोब्रागडे, सुरेश गजभिये विजयी झाले आहेत. तिवसा तालुक्यात आखतवाडा येथे प्रकाश गावंडे, शाहिन तबस्सुम शे. आबीद, स्नेहल गावंडे, तायरुन्नीसा सय्यद कमरुद्दीन, गुलाम रसूल शेख मुस्तफा, कवाडगव्हाण येथे मीना मेंढे, मालू मुडे, ज्योती मेंढे, उंबरखेड येथे प्रीती अळसपुरे, शिल्पा पांडव, घोटा येथे संगीता सोनोने, अनकवाडी येथे दिनेश साबळे, दुर्गवाडा येथे आकाश ठाकरे व वणी येथे मुकुंद पुनसे अविरोध निवडून आले आहेत. (प्रतिनिधी)
चांदूररेल्वे न.प. पोटनिवडणुकीत भाजपचे गणेडीवाल विजयी
चांदूर रेल्वे : नगर परिषदेच्या प्रभाग १ मधील एका जागेसाठी १७ एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी १० वाजता नगर परिषद कार्यालयात घेण्यात आली. यात भाजपाच्या प्रमिला गोपाल गणेडीवाल विजयी झाल्यात. मागील सार्वजनिक निवडणुकीत ही जागा काँग्रेसकडे होती. प्रभागातील एकूण ४६२२ मतदारांपैकी १८४९ मतदारांनी हक्क बजावला. ४० टक्के मतदान झाले होते. यात भाजपच्या प्रमिला गणेडीवाल यांना ८६६, काँग्रेसच्या शुभांगी अविनाश वानरे ८१५ मते, अपक्ष लता अविनाश गावंडे यांना ९९ मते मिळाली. या पोटनिवडणुकीत मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला. यात ६९ मतदारांनी नाकारार्थी मतदान केले. भाजपच्या गणेडीवाल यांनी काँग्रेसच्या वानरे याचा ५१ मतांनी पराभव केला.
अंजनगाव न.प. पोटनिवडणुकीत काँग्रेसचे अ. कलीम विजयी
अंजनगाव सुर्जी : नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.३ मधे झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे अ. कलीम अ. कलाम हे १५९७ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी अपक्ष उमेदवार से. रहीम से. रहेमान यांचा पराभव केला. या निवडणुकीत मो. हासिम मो. हनिफ यांना ११० मते तर जमील खाँ कादर खाँ यांना ५०, गजानन बारड यांना ४६१ मते मिळाली व ‘नोटा’ला ७० मते मिळाली. निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी काम पाहिले.
ग्रा.पं. निवडणुकीतही ठाकूर यांची जादू कायम
तिवसा तालुक्यात आ. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्त्वात यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपंचायत आणिखरेदी-विक्री संघाची निवडणूक झाली. यामध्ये त्यांना एकहाती विजय मिळाला आहे. सोमवारी उंंबरखेड, भारसवाडी, आखतवाडा, कवाडगव्हाण या ग्रामपंचायतींमध्येही आ. ठाकूर गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत.