ग्रामपंचायत सदस्य शारदा उईके पायउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 10:19 PM2017-09-27T22:19:53+5:302017-09-27T22:20:02+5:30

नजीकच्या देवमाळी ग्रामपंचायतीच्या सदस्य शारदा संजय उईके यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

Gram Panchayat member Sharda Uike stepped down | ग्रामपंचायत सदस्य शारदा उईके पायउतार

ग्रामपंचायत सदस्य शारदा उईके पायउतार

googlenewsNext
ठळक मुद्देअतिक्रमण भोवले : अप्पर जिल्हाधिकाºयांचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : नजीकच्या देवमाळी ग्रामपंचायतीच्या सदस्य शारदा संजय उईके यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. हा निर्णय अप्पर जिल्हाधिकाºयांनी दिला. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
देवमाळी ग्रामपंचायतीच्या सदस्य शारदा संजय उईके यांनी राहत्या घरानजीक सांडपाणी वाहून नेणाºया नाल्यासह रस्त्यावर व सर्व्हिस लाईनवर अतिक्रमण केल्याची तक्रार प्रहारचे ग्रामपंचायत सदस्य अरुण खाटकळे यांनी अप्पर जिल्हाधिकारी के.आर. परदेशी यांच्याकडे केली होती. ही तक्रार हेतूस्परस्सर असल्याचा दावा ऊईके यांच्या वकिलांनी केला होता. याप्रकरणी ग्रामपंचायतीच्या चौकशी अहवालासह मौका पाहणी करण्यात आली. यात ऊईके यांनी ११०.५० चौ. मीटर शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले.
प्रहार सोडणे
पडले महागात
प्याआधारे शारदा उईके यांचे सदस्यत्व रद्द झाले. यासंदर्भात महाग्रामपंचायत १९५८ चे कलम १४ (१) (ज-३) चा हवाला देण्यात आला.
देवमाळी ग्रामपंचायतीमध्ये एकूण ११ सदस्य संख्या आहे. त्यामध्ये सहा सदस्य आ. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे होते. शारदा उईके या प्रहारच्या असताना पाच महिन्यांपूर्वी झालेल्या उपसरपंचाच्या निवडणुकीत त्यांनी ‘प्रहार’विरुद्ध मतदान केले होते. यानंतर अरुण खाटकळे यांनी तक्रार केली होती.

Web Title: Gram Panchayat member Sharda Uike stepped down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.