ग्रामपंचायतींची प्रभाग रचना, आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर

By admin | Published: January 7, 2016 12:17 AM2016-01-07T00:17:59+5:302016-01-07T00:17:59+5:30

जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जुलै ते डिसेंबर २०१६ दरम्यान संपणार आहे.

Gram Panchayats ward structure, reservation program | ग्रामपंचायतींची प्रभाग रचना, आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर

ग्रामपंचायतींची प्रभाग रचना, आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर

Next

आयोगाची तयारी : १४ जानवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान कार्यक्रम
अमरावती : जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जुलै ते डिसेंबर २०१६ दरम्यान संपणार आहे. या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकपूर्व प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला. १४ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
अमरावती तालुक्यामध्ये रोहणखेडा, तिवसा तालुक्यामधील उंबरखेड, आखतवाडा, कवाडगव्हाण व घोटा तसेच चांदूररेल्वे तालुक्यामधील चांदूरवाडी ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जुलै ते डिसेंबर २०१६ दरम्यान संपणार आहे. या ग्रापंच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पूर्वतयारीत प्रभाग रचना व चक्रानुक्रमे आरक्षण हा सुरुवातीचा टप्पा असतो.

Web Title: Gram Panchayats ward structure, reservation program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.