ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य तालुका कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:10 AM2021-06-24T04:10:16+5:302021-06-24T04:10:16+5:30
दर्यापूर : ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य यांची दर्यापूर तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यात तालुकाध्यक्षपदी दारापूरचे उपसरपंच अ. ...
दर्यापूर : ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य यांची दर्यापूर तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यात तालुकाध्यक्षपदी दारापूरचे उपसरपंच अ. जमील अ. मजिद पटेल व उपाध्यक्षपदी अनिल भारसाकळे (बेलोरा) यांची निवड झाली.
महिला तालुकाध्यक्षपदी प्रतिभा माकोडे (येवदा) व उपाध्यक्षपदी मोहिनी हुतके (वडनेर गंगाई) यांची निवड झाली. दारापूरच्या सरपंच आशा वामन गवई, संजय बेलोकार, विजय भुतडा, पुरुषोत्तम दहिकर, ग्रामसचिव भूषण बानते, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गवई, प्रमोद शेवतकर, अ. वसीम मो. इसा, कल्पेश खिरळकर, काजल धंदर, सुनीता डोईफोडे, कांचन घुरडे, सुनंदा भुसारी, शहनाज परवीन सलीम शाह, राहुल वानखडे, नंदकिशोर ढवळे, नंदकिशोर अवघड, अश्विन खडसे, संजय ढवळे, मोहन गवई, सुधीर धंदर, मो. इशरत शे. महम्मद यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
===Photopath===
230621\img-20210619-wa0029.jpg
===Caption===
ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य तालुका कार्यकारणी जाहीर..