नातवानेच केला आजीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:10 AM2021-07-10T04:10:58+5:302021-07-10T04:10:58+5:30

मोबाईलसाठी चोरली सोन्याची पोत, अंत्यसंस्कारातून सुगावा, २४ तासात उलगडा लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणवाडा थडी (अमरावती) : येथील ७५ ...

Grandmother killed her grandson | नातवानेच केला आजीचा खून

नातवानेच केला आजीचा खून

Next

मोबाईलसाठी चोरली सोन्याची पोत, अंत्यसंस्कारातून सुगावा, २४ तासात उलगडा

लोकमत न्यूज नेटवर्क

ब्राह्मणवाडा थडी (अमरावती) : येथील ७५ वर्षीय वृद्धेचा तिच्या नातवानेच खून केल्याचा उलगडा पोलीस तपासात झाला आहे. साध्या वेशातील पोलीस त्या वृद्धेच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले. त्यातील चर्चेनुसार, पोलिसांनी आरोपी नातवाला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. सूरज प्रल्हाद अमझरे (२९, रा. भोईपुरा, ब्राह्मणवाडा थडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी त्याला अटक केली.

८ जुलै रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ७५ वर्षीय गिरिजा आण्याजी अमझरे या वृद्धेचा खून झाला. तर, महिलेच्या गळ्यातील पोत गहाळ असल्याचे पंचनाम्यादरम्यान सांगण्यात आले. चोरीच्या उद्देशाने हा खून झाला असावा, या शक्यतेने पोलिसांनी चौकशीला वेेग दिला.

सकाळी १० वाजतादरम्यान राहत्या घरी खून झाल्यामुळे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी एलसीबी व स्थानिक पोलिसांना आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले होते. ठाणेदार दीपक वळवी, पीएसआय संजय शिंदे, त्र्यंबक सोळुंके, कैलास खेडकर यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला शुक्रवारी दुपारी अटक केली. आरोपीकडून मृत महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत व खुनासाठी वापरलेला सराटा ताब्यात घेतला. आरोपीने ती पोत ही पाणीपुरवठ्याच्या विहिरी शेजारील दगडाखाली लपवून ठेवली होती. सराटा हा घराबाजूनी असलेल्या ले-आउटमधील नालीत फेकून दिला होता.

बॉक्स

गुन्ह्याची कबुली

आरोपी हा मयत आजीच्या अंत्यसंस्कारातून घरी आल्यानंतर तब्येत बरी नसल्याचे कारण सांगून घरामध्ये झोपून राहिला. पीएसआय शिंदे व त्यांचे सहकारी कैलास खेडकर, त्र्यंबक सोळुंके हे अंत्यसंस्कारात साध्या गणवेशात सामील झाले होते. पीएसआय शिंदे यांनी, तर मृत महिलेचे पतीला छत्रीचा सहारा दिला. तेथे झालेल्या चर्चेवरून पीएसआय शिंदे यांचा संशय बळावला. आरोपी सूरज प्रल्हाद अमझरे याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्‍या दाखविला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Web Title: Grandmother killed her grandson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.