शेतकऱ्यांना बैलचलित अवजारासाठी अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 10:20 PM2018-07-20T22:20:04+5:302018-07-20T22:21:15+5:30
जिल्हा परिषद सेस फंडातून कृषी विभागामार्फत आतापर्यत शेतकºयांना शेतीकासाठी ट्रॅक्टरचलित साहित्यासाठी अनुदान दिले जात होते. आता मात्र याऐवजी बैलचलित शेती औजारांसाठी अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या कृषी समिती घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषद सेस फंडातून कृषी विभागामार्फत आतापर्यत शेतकऱ्यांना शेतीकासाठी ट्रॅक्टरचलित साहित्यासाठी अनुदान दिले जात होते. आता मात्र याऐवजी बैलचलित शेती औजारांसाठी अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या कृषी समिती घेतला आहे.
जिल्हा परिषद सेस फंडातून दरवर्षी शेतकºयांना शेतीकामासाठी साहीत्य खरेदीसाठी ७५ टक्के अनुदान दिले जाते. परंतु, हे अनुदान आतापर्यत टॅक्टरचलित साहित्याला दिले जात असे. परंतु, सर्वच शेतकऱ्याकडे टॅक्टर नसल्याने याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होत नव्हता. ही बाब लक्षात घेता, जिल्हा परिषद कृषी समितीने शेतीसाहित्याचे अनुदान यापुढे ट्रॅक्टरचलित शेती औजाराऐवजी बैलचलित औजारांना देण्याचा ठराव कृषी समितीने पारीत केला आहे. जिल्हा परिषद कृषी विषय समितीची सभा २० जुलै रोजी उपाध्यक्ष तथा सभापती दत्ता ढोमणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेत यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बोगस बियाण्याचा पुरवठा झाल्याचा मुद्दा सदस्य प्रकाश साबळे,प्रवीण तायडे,प्रताप अभ्यंकर आदी उपस्थित केला.सदस्यांच्या आक्षेपानुसार कृषी विभागाकडे १५५ बोगस बियाण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.त्यात महाबीजच्या बियाण्याच्याच ८७ तक्रारी असल्याचे साबळे यांनी कृषी अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे बोगस बियाणे पुरवठा करणाऱ्यांवर काय कारवाई केली याचा जाब त्यांनी विचारला.दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्यावतीने बोगस बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपनी विरोधात ग्राहक मंचात शासनाने दाद मागावी व शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी कृषी समितीच्या सदस्यांनी केली. सभेला उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सदस्य प्रताप अभ्यंकर, प्रवीण तायडे, गजानन राठोड, जयश्री कोहचाडे, गजानन देवतळे, कृषी विकास अधिकारी तडवी व अन्य अधिकारी उपस्थित होते.