गॅसकार्डअभावी अनुदान रखडले

By admin | Published: April 9, 2015 12:28 AM2015-04-09T00:28:39+5:302015-04-09T00:28:39+5:30

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात काही लोकांनी सहा महिने आधी स्वयंपाकासाठी एका कंपनीचे सिलिंडर शेगडी घेतली.

Grant of subsidy for gascards | गॅसकार्डअभावी अनुदान रखडले

गॅसकार्डअभावी अनुदान रखडले

Next

कार्ड देण्यास टाळाटाळ : सिलिंडरधारकांची परवड
मोखड : नांदगाव खंडेश्वर तालुक्यात काही लोकांनी सहा महिने आधी स्वयंपाकासाठी एका कंपनीचे सिलिंडर शेगडी घेतली. परंतु अजूनही कार्ड देण्यात आले नसल्यामुळे ग्राहकांच्या खात्यात सबसिडी जमा होत नसल्याने ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांना सिलिंडर लागल्यास जादा दराने विकत घ्यावे लागत आहे. ग्राहकांना मात्र आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या व्यवहारात काही दलाल सक्रिय असून ग्राहक त्रस्त व दलाल मस्त, असे चित्र आहे.
सध्या शहरात नव्हे, तर खेड्यापाड्यातही चुलीची जागा गॅस सिलिंडरने घेतली आहे. त्यातच शासनाने गॅस सिलिंडरवर सबसिडी दिल्यामुळे मजुरी करणारी व्यक्तीसुद्धा गॅस सिलिंडर वापरत आहेत. सबसिडी ग्राहकाच्या खात्यात जमा होत असल्याने सामान्य व्यक्ती सुद्धा गॅस सिलिंडरचा उपयोग घेत आहेत. परंतु सहा महिने होऊनही कार्ड न मिळाल्यामुळे काही ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत आहे. कार्ड केव्हा मिळणार याची ग्राहकांना प्रतीक्षा लागली आहे. गॅस संपल्यास जादा पैसे देऊन सिलिंडर खरेदी करावे लागते.
हा खेळ किती दिवस चालणार हा प्रश्नच आहे. कार्ड नसलेल्या सिलिंडरधारकांना अवैध सिलिंडर म्हणावे का या अवैध सिलिंडरचा वाली कोण? ग्राहकांनी तर ६००० रुपये देऊन दलालामार्फत कंपनीचे गॅस कनेक्शन घेतले. मात्र कार्ड देण्यात विलंब होत असल्याने ग्राहकांची आर्थिट लूट होत आहे. तालुक्यात असे अनेक ग्राहक असून प्रत्येकाला सिलिंडर कार्ड मिळणे आवश्यक आहे.
पण अपुरी माहिती तसेच ग्रामीण भागात गॅसधारक सहा महिने एकाच सिलिंडरचा वापर करतो कारण मजुरी नाही, नापिकी इत्यादी कारणांनी जास्तीत जास्त खेड्यातील महिला चुलीचाच वापर करतात. परंतु आपल्या घरी गॅस असावा म्हणून ठराविक वेळेतच गॅसचा वापर करतात. काही महिलांनी सहा महिने गॅस जातो, असे सांगितले. हे दलाल कार्ड न देता ग्राहकांच्या नावे गॅस सिलिंडर उचलून जादा दराने गॅस देऊन गरीब ग्राहकांचे नुकसान करीत आहेत. स्वयंपाकासाठी रॉकेलही मिळत नसल्याने नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. (वार्ताहर)

Web Title: Grant of subsidy for gascards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.