शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेत ‘ग्रीन फॅशन्स’
By admin | Published: January 10, 2016 12:17 AM2016-01-10T00:17:44+5:302016-01-10T00:17:44+5:30
शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील गृहशास्त्रविभाग, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व १६ जानेवारीला ग्रीन टेक्सटाईल्स,...
राज्यस्तरीय कार्यशाळा : गृहशास्त्र विभागाचे आयोजन
अमरावती : शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील गृहशास्त्रविभाग, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व १६ जानेवारीला ग्रीन टेक्सटाईल्स, फॅशन्स, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तत्पूर्वी १० जानेवारीला ‘निसर्ग रंग वाचवतील निसर्ग’ यासंकल्पनेवर आधारित पारंपरिक भारतीय चित्रकला एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा होणार असल्याची माहिती गृहशास्त्रविभागप्रमुख तथा समन्वयक अंजली देशमुख यांनी दिली.
१५ जानेवारीला विभागीय आयुक्त ज्ञा.स. राजूरकर तथा प्रसिध्द चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भरत कलेवर आधारित स्पर्धा व प्रदर्शनीचे उद्घाटन होईल. १५ व १६ जानेवारीला ग्रीन टेक्सटाईल्स, ग्रीन फॅशन्स कार्यशाळा होणार आहे. राज्यातील विद्यार्थी, बुटिक डिझायनर्स, छंद समूह तसेच गृहिणीमधील सुप्त गुण शोधून त्यांना व्यवसाय व उद्योगामध्ये ओळख मिळावी, या हेतूने हे व्दिदिवसीय कार्यशाळा स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान १० जानेवारीला होणाऱ्या पारंपरिक भारतीय चित्रकलेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत सुमारे २५० विद्यार्थी तसेच चित्रकार सहभागी होणार आहेत. प्राचीन चित्र शैलीवर आधारित राज्यात पहिल्यांदाच ही स्पर्धा वजा कार्यशाळा होत असल्याची माहिती शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या संचालक संगीता यावले यांनी दिली.