दारापुर ग्रामपंचायमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:12 AM2021-04-15T04:12:28+5:302021-04-15T04:12:28+5:30

प्रतिनिधी :-गजानन खोपे वाठोडा शुक्लेश्वर दारापुर ग्रामपंचायत सभागृह येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती ...

Greetings on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar's birthday in Darapur Gram Panchayat | दारापुर ग्रामपंचायमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य अभिवादन

दारापुर ग्रामपंचायमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य अभिवादन

Next

प्रतिनिधी :-गजानन खोपे

वाठोडा शुक्लेश्वर

दारापुर ग्रामपंचायत सभागृह येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साधेपणाने साजरी करुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून अभिवादन केले.

-------------

विभागीय माहिती कार्यालयात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

अमरावती, दि १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय माहिती कार्यालयात सहायक संचालक गजानन कोटुरवार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी छायाचित्रकार मनीष झिमटे, कोमल भगत, गणेश वानखेडे उपस्थित होते.

दारापुर ग्रामपंचायत येथे पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजित पटेल, संजय बेलोकार, विजय भुतडा, दिनेश शेवतकर, सरलाताई इंगळे, पुरुषोत्तम दहिकर,अमोल देशमुख, कार्यक्रमाचेप्रमुख अतीथी म्हणुन सरपंच श्रीमती आशाताई वामन गवई,उपसरपंच जमील पटेल हे होते.उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे जयंती साधेपणाने साजरी करावी,असे आवाहन ज्येष्ठ समाजबांधवांनी केले होते.

त्यानुसार जयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता. सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन हारार्पण करण्यात आले.तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी कल्पेश खिरळकर,सौ. सुनंदा डोईफोडे,शहनाज परवीन शहा,सौ.काजल धंदर,मो.वसीम ईसा,सौ.कांचन दिनेश घुरडे,प्रमोद शेवतकर,सौ. सुनंदा भुसारी,राजु गवई. संजय ढवळे, राहुल वानखडे, नंदकिशोर ढवळे मोहन गवई. सुधीर धंदर, अब्दुल मुकीम पटेल, अश्विन खडसे, म इशरत शे महम्मद,आदिची उपस्थिती होती.

-------------

शिवाजी शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती लॉक डाऊन नियमांचे पालन करत उत्साहात साजरी

मोर्शी

तालुका प्रतिनिधी

स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोविड-19 (कोरोना) संसर्गजन्य विषाणूंच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन नियमांचे पालन करत उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक एस.आर.देशमुख तर प्रमुख उपस्थिती मध्ये पर्यवेक्षक एस.एन.गुर्जर,आर.एम.देशमुख,जेष्ट शिक्षक बी.पी.पावडे,शिवदास बाजारे,सारंग जाणे,नलिनी खवले,लता लांडगे,वंदना खांडे,सौ राईकवार, सौ.बोबडे,श्रीधर लबडे,प्रदीप धोटे उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शाळेतील सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धमध्ये ऑनलाईन पध्दतीने सहभागी करून घेण्यात आले.या विद्यार्थ्यांना अमित कानफाडे,मुक्ता बोरकर,प्रविना बोहरोपी,प्रेमा नवरे यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्रेमा नवरे,प्रास्ताविक उद्धव गिद तर आभार अमित कानफाडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक गिलोरकर,आगरकर,सतीश जयस्वाल, तुळशीदास गेंद यांनी परिश्रम घेतले.

------------

विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

अमरावती.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती कोविड-१९ नियमांचे पालन करीत उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रफुल्ल गवई, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रमुख डॉ. हेमंत देशमुख, वित्त व लेखा अधिकारी डॉ. भारत कऱ्हाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. राजेश बुरंगे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. दिनेश सातंगे, उपकुलसचिव डॉ. नितीन कोळी, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. गजानन मुळे, उपकुलसचिव मंगेश वरखेडे, विद्यापीठाचे विभाग प्रमुख, अधिकारी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉ. आंबेडकर अभ्यासकेंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अमरावती.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यासकेंद्रात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुध्द व कर्मयोगी श्री संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विद्यापीठाचे शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख, अधिकारी, अध्यासन प्रमुख डॉ. गजानन गुल्हाने, डॉ. दिलीप काळे, डॉ. सुरेश जगताप, श्री प्रवीण राठोड, श्री शशिकांत रोडे, श्री राजेश एडले, समन्वयक डॉ. गजानन मुळे, तसेच कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Web Title: Greetings on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar's birthday in Darapur Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.