देवळी, गांधी पूल येथील तक्रार निवारण केंद्रे मूळ जागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:16 AM2021-07-14T04:16:19+5:302021-07-14T04:16:19+5:30
फोटो - अचलपूर : देवळी व गांधी पूल येथील तक्रार निवारण केंद्र व वीज बिल भरणा केंद्र महावितरणचे अतिरिक्त ...
फोटो -
अचलपूर : देवळी व गांधी पूल येथील तक्रार निवारण केंद्र व वीज बिल भरणा केंद्र महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या पॉवर हाऊस येथील कार्यालयात स्थानांतरित करण्यात आले होते. त्याविरोधात सोमवारी भाजपने ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यांनी आंदोलकांची मागणी मान्य केली. तसे लेखी पत्रही दिले. यामुळे ही तक्रार निवारण केंद्रे पूर्वीच्या ठिकाणी सुरू केली जाणार आहेत.
तक्रार निवारण केंद्रे काही दिवसांपूर्वी विदर्भ मिल परिसरातील पाॅवर हाऊसमध्ये आणली गेली. त्यामुळे अचलपूर शहरातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. ती केंद्रे पूर्वीच्या ठिकाणी सुरू करण्याच्या मागणीवरून २९ जून रोजी महावितरण कार्यालयात निवेदन देण्यात आले होते. त्यावर १५ दिवस होऊनही कार्यवाही होत नसल्याचे पाहून सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. अतिरिक्त कार्यकारी अधिकाऱ्यांनी जुनी केंद्रे सुरू करण्यात येईल, असे लेखी पत्राद्वारे आश्वासन द्यावे, अशी मागणी आंदोलकांची होती. यावेळी शहर अध्यक्ष अभय माथने यांच्या नेतृत्वात ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गजानन कोल्हे, जिल्हा सचिव विनिता धर्मा, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष संजय केजडीवाल, सरचिटणीस सुमीत चौधरी, अमर मेघवानी, उपाध्यक्ष शंकर बाछाणी, नीलेश सातपुते, प्रवीण तोंडगावकर, युवा मोर्चा अध्यक्ष महेश कडू, सोहन खोलपुरे, नीलेश पवार, सचिव वैभव जयस्वाल, छोटू लडोळे, विजय मिश्रा, आशिष मानमोडे, जहूरभाई, दीपक दौलतानी, राजेश सुंडे वाले, अमर ठाकूर, योगेश थोरात आदी पदाधिकारी, कार्यकर्ता आंदोलनात उपस्थित होते. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.