भूदान जमिनीच्या तीन सातबाऱ्यांमध्ये घोळ

By Admin | Published: January 20, 2016 12:27 AM2016-01-20T00:27:22+5:302016-01-20T00:27:22+5:30

तिवसा तालुक्यात भूदान जमिनीच्या सातबऱ्यामधील भोगवटदार वर्ग बदलले जाऊन जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती आहे.

Groundnut in three rounds of land in Bhoodan | भूदान जमिनीच्या तीन सातबाऱ्यांमध्ये घोळ

भूदान जमिनीच्या तीन सातबाऱ्यांमध्ये घोळ

googlenewsNext

तिवसा तालुका : भोगवटदार वर्ग-१ करुन जमिनीची विक्री
गजानन मोहोड अमरावती
तिवसा तालुक्यात भूदान जमिनीच्या सातबऱ्यामधील भोगवटदार वर्ग बदलले जाऊन जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती आहे. भूदान जमिनी अहस्तांतरणीय असून त्यांची कायद्याने विक्री होत नसताना हे व्यवहार कायदेशीर ठरविल्याने महसूल विभागाच्या एकूण कारभारावरच प्रश्नचिन्ह लागले आहे.
तिवसा तालुक्यात अनकवाडी, मार्डी, गोदरी व विचोरी ही भूदानी गावे आहेत. या पैकी भूमापन क्र- ९१ मौजे अनकवाडी येथील बाबलाजी मेटकर यांना सन १९५२-५३ मध्ये भूदान जमिनीचा ३.२९ हेक्टर/आर पट्टा देण्यात आला.

तहसीलदारांकडे तक्रार
अमरावती : या जमिनीपैकी २.४८ हेक्टर/आर भूदान जमीन ही वारसा हक्क वाटणीद्वारे १ सप्टेंबर १९७७ रोजी महादेव यादवराव मेटकर (पट्टाधारकाचा नातू) यांचे नावे नोंदविण्यात आली व तीन महिन्यानंतर भूदान जमीन ७ डिसेंबर १९७७ रोजी पार्वताबाई महादेव बालपांडे यांना विकली गेली. पार्वताबाई बालपांडे यांनी २.४८ हेक्टर/ जमीनीपैकी १.४४ हेक्टर/ आर भूदान जमीन ही नरेंद्र वसंतराव ठाकूर यांना २१ नोव्हेंबर १९९२ रोजी विकली. या संदर्भात दाखल प्रकरणात नायब तहसीलदार तिवसा यांनी पारित २७ जानेवारी २००९ च्या आदेशात नमूद केले आहे की महादेव यादवराव मेटकर यांचेकडील २.४८ हेक्टर/ आर जमीन हे हक्काने भूमीस्वामी होते. त्यामुळे सातबाऱ्यावर असलेला भोगवटदार वर्ग-२ असा उल्लेख हा त्यांना चुकीचा वाटला. यामुळे दोन्ही खरेदी- विक्री व्यवहार कायदेशीर ठरविल्याची बाब भूदानतज्ज्ञ मंडळाद्वारा जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणली गेली. या प्रकरणात भूदानयज्ञ मंडळाद्वारा २८ जुलै २०११ रोजी तिवसा तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही. या संदर्भात मंडळाद्वारा १० आॅगस्ट २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले असतांना अद्यापही प्रकरण ठप्पच आहे. वास्तविकत: भूदान जमिनीचा पट्टा प्राप्त झालेला इसम हा भूदान अधिनियम १९५३ कमल २४ अन्वये ‘भूदानधारक’ म्हणून नोंदविला जाण्याची स्पष्ट सूचना कायद्यात आहे व भूदानधारक या जमिनीची विक्री करु शकणार नाही अथवा भाड्याने देऊ शकणार नाही, अशी अट या कायद्याच्या कलम २४ (सी) व (डी) अन्वये असताना तिवसा तालुक्यामधील भूदान जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार कायदेशीर ठरविले गेले, हे धक्कादायक आहे.

नियमबाह्य हस्तांतरण, कारवाई केव्हा?
आर्थिक व्यवहारात भोवर्ग बदलवून हस्तांतरण होत आहे. यामध्ये भूदानयज्ञ मंडळाची फसवणूक व जमीन मालकी संपविली जात आहे. भूदानयज्ञ मंडळ कायदा १९५३ मधील कलम २४ चा भंग झाला म्हणून शासनाने कलम २५ चा वापर करुन ती जमीन हस्तगत करुन मंडळाची दुहेरी फसवणूक करीत असल्याचा मंडळाचा आरोप आहे. मंडळाकडे स्वत:ची दंडनीय शक्ती नसल्याने भूदानाचा उदात्त हेतूच संपविण्याचे कारस्थानाच हा प्रकार आहे. नियमबाह्य हस्तांतरीत जमीन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केव्हा करणार असा मंडळाचा सवाल आहे.

भूदान सातबाऱ्यासंदर्भात या संदर्भात तिवसा तहसीलदार यांचेकडे डायरी पाठविण्यात आली काय याची माहिती घेतो. भूदान जमीनीचे भोगवटदार वर्ग बदलले असल्यास पुन्हा त्यांची नोंद करता येईल
- शिवाजी जगताप
उपविभागीय अधिकारी,
तिवसा, भातकुली

Web Title: Groundnut in three rounds of land in Bhoodan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.