शहरात झोननिहाय भाजी विक्रेत्यांसाठी मैदाने निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:12 AM2021-05-23T04:12:51+5:302021-05-23T04:12:51+5:30

अमरावती : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशाने सकाळी ७ ते ११ या वेळेत भाजीपाला विक्रीसाठी मुभा देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने महापालिका ...

Grounds fixed for zone-wise vegetable vendors in the city | शहरात झोननिहाय भाजी विक्रेत्यांसाठी मैदाने निश्चित

शहरात झोननिहाय भाजी विक्रेत्यांसाठी मैदाने निश्चित

Next

अमरावती : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशाने सकाळी ७ ते ११ या वेळेत भाजीपाला विक्रीसाठी मुभा देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रात आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशाने भाजीपाला विक्रीसाठी झोननिहाय मैदाने निश्चित करण्यात आलेली आहे.

मुख्य रस्त्यावर एकाच ठिकाणी थांबून भाजीपाला विक्रीस मनाई करण्यात आलेली आहे. याशिवाय घरपोच भाजी तसेच फळविक्रीची मुभा राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. झोन क्रमांक १ मध्ये विद्यापीठ चौकात तपोवनजवळील मैदान व इतवारा बाजार, झोन क्रमांक २ मध्ये रुख्मिणीनगरात महापालिकेची १९ क्रमांकाची शाळा, सदानंद नगरातील खुली जागा, कठोरा रोड समता नगरातील खुली जागा, नवसारी बसस्टॉप येथील खुली जागा, झोन क्रमांक २ मध्ये डॉ. पाटोळे यांच्या दवाखान्याजवळ, झोन क्रमांक ३ मध्ये ग्रेटर कैलाश नगर येथील ओपन स्पेस, छत्री तलावाच्या उत्तरेस शासकीय जागा, चपराशीपुरा येतील शुक्रवार बाजार, झोन क्रमांक ४ मध्ये आकोली रोड फॉरेस्ट कॉलनी येथील महापालिकेची जागा, सातुर्णा सार्वजनिक वापरासाठीची खुली जागा, जुनी वस्ती बडनेरा येतील बैल बाजार, अंबा मंगलमचे बाजूला भटवाडीचे मैदान, बडनेरा राहुलनगरातील खुली जागा, बडनेरा सावता मैदान, बडनेरा नवी वस्तीतील महापालिका मुलींची शाळा व सोमवार बाजार, याशिवाय झोन क्रमांक ५ मध्ये बुनियादी शाळेचे उत्तरेकडील मैदान व सुकळी आकोली वळण रस्त्यावरील जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत.

बॉक्स

या नियमांचे पालन आवश्यक

दोन हातगाडीमध्ये १० फुटांचे अंतर आवश्यक, विहित वेळेनंतर भाजीपाला व साहित्य ठेवता येणार नाही. सर्व फेरीवाल्याची अॅन्टीजन टेस्ट आवश्यक राहील. फेरीवाला कंटेनमेंट झोनचा रहिवाशी नसावा व दोन व्यक्तीमध्ये किमान सहा फुटांचे असावे यासीवाय सॅनिटायझर मॉस्क व डस्टबिनचा वापर अनिवार्य राहनार आहे.

Web Title: Grounds fixed for zone-wise vegetable vendors in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.