पदोन्नतीसाठी झेडपी कर्मचाºयांचे सामूहिक मुंडन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 10:52 PM2017-10-02T22:52:17+5:302017-10-02T22:52:39+5:30
वर्षभरापासून झेडपीतील लपिकवर्गीय संवर्गातील पदोन्नतीची प्रकरणे प्रलंबित असल्याने अन्यायग्रस्त कर्मचाºयांनी २ आॅक्टोबर रोजी सामूहिक मुंडन करून प्रशासनाचा निषेध नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वर्षभरापासून झेडपीतील लपिकवर्गीय संवर्गातील पदोन्नतीची प्रकरणे प्रलंबित असल्याने अन्यायग्रस्त कर्मचाºयांनी २ आॅक्टोबर रोजी सामूहिक मुंडन करून प्रशासनाचा निषेध नोंदविला. पदोन्नतीपात्र कर्मचाºयांना मागील दहा वर्षांपासून पदोन्नती न दिल्याने प्रशासनप्रमुखांकडे जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेने निवेदनाव्दारे वारंवार मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीच कारवाई न झाल्याने अन्यायग्रस्त कर्मचाºयांनी सामूहिक मुंडन केले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
पदोन्नत संवर्गातील पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रशासनाने पात्र कर्मचाºयांचे पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत. त्यामुळे संबंधित कर्मचाºयांचे प्रशासकीय तथा आर्थिक नुकसान होत आहे. विभागातील इतर जिल्ह्यांतील पदोन्नतीची प्रकरणे यापूर्वीच निकाली निघाल्याने इतर जिल्ह्यातील कर्मचारी वर्ग-२ पदाकरिता विभागीयस्तरावरील पदोन्नतीच्या सेवाज्येष्ठता यादीमध्ये पात्र ठरले आहेत. परंतु अमरावती जि.प.मधील पदोन्नतीची २३६ पदे अद्यापही रिक्त आहेत. यामळे झेडपी कर्मचारी युनियन, लिपिकवर्गीय संघटनेच्या पदाधिकाºयांनी सामूहिक मुंडन करून निषेध नोंदविला.
याच्या निषेधार्थ झेडपीच्या २२ कर्मचाºयांनी मुंडन केले. यामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने, सचिव संजय राठी, कार्याध्यक्ष संजय येवतीकर, समीर चौधरी, प्रशांत धर्माळे, मंगेश मानकर, श्रीकांत मेश्राम, विजय कविटकर, ईश्वर राठोड, विजय उपरीकर, संजय गोहत्रे, विजय कोठाळे, गजानन गोहत्रे, प्रवीण जिचकार, ऋषिकेश कोकाटे, छनराज कुल्हे, सुनील रोकडे, चंदू टेकाडे, पंकज गोरले, अतुल मुडे, नागेश कासेटीवार, पंकज आसरे यांचा यात समावेश आहे.
१० वर्षांत कधी नव्हे एवढी पदोन्नतीची प्रकरणे प्रलंबित आहेत. पदोन्नती न दिल्याने कर्मचाºयांवर अन्याय होत आहे. विकासकामे व प्रशासकीय कामकाजातही अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा अन्याय दूर व्हावा.
- पंकज गुल्हाने,
जिल्हाध्यक्ष, कर्मचारी युनियन