किडनीच्या आजारात वाढ, सुपरस्पेशालिटी ठरते वरदान

By admin | Published: March 9, 2017 12:16 AM2017-03-09T00:16:22+5:302017-03-09T00:16:22+5:30

देशामध्ये किडनी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अंबानगरीतही अनेक रुग्ण आढळतात.

Growth of Kidney Disease, Supercondition Benefits | किडनीच्या आजारात वाढ, सुपरस्पेशालिटी ठरते वरदान

किडनीच्या आजारात वाढ, सुपरस्पेशालिटी ठरते वरदान

Next

जागतिक किडनी दिन : किडनी प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध
अमरावती : देशामध्ये किडनी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अंबानगरीतही अनेक रुग्ण आढळतात. यामध्ये अशा रुग्णासाठी येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल वरदान ठरले आहे. येथील विभागीय संदर्भसेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) अमरावतीमध्ये किडनी ट्रान्सप्लान्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सन २००८ मध्ये या रुग्णालयाची प्रगती होत आहे.

जीवनदायीतून नि:शुल्क सुविधा
अमरावती : पाचही जिल्ह्यांतील रुग्णांना येथे चांगली सेवा देण्यात येते. या रुग्णालयात दरवर्षी पाच ते साडेपाच हजार डायलिसीसचा उपचार होतात. सध्या या रुग्णालयात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील १५० रुग्णांवर डायलेसीस सुरू आहे. किडनीच्या आजाराच्या रुग्णांकरिता डायलेसीस हा तात्पुरता उपचार असून, अशा रुग्णांवर किडनी प्रत्यारोपणाद्वारे रुग्णाला जीवदान मिळू शकते. अमरावती शहरात आतापर्यंत ही सुविधा उपलब्ध नव्हती. परंतु आता शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालय अमरावती येथे ही सुविधा शासनाच्या आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिली आहे. खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेचा खर्च ४ ते ५ लाखांपर्यंत येतो. मात्र, या रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत असल्यामुळे रुग्णांना विनामूल्य ही सेवा मिळणार आहे.
गुरुवार ९ मार्च हा जागतिक किडनी दिन म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सुपर स्पेशालिटी रुग्णालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीचे घोषवाक्य ‘निरोगी किडनीसाठी निरोगी जीवनशैली’ हे आहे. याप्रसंगी किडनी विविधज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वानी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्यामसुंदर निकम यांनी जनतेस केले आहे.

किडनी
आजाराची लक्षणे
लघवीत जळजळ होणे, वारंवार लघुशंकेला जाणे, पायावर सुज येणे, धूम्रपान आदी लक्षणे किडनी आजाराची असून शकतात. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन घेणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.

किडनीच्या आजाराची कारणे
वेदनाशामक औषधींचे अधिक सेवन, जंतु संसर्ग झाल्यास,मधुमेह, उच्च रक्तदाब, अती लठ्ठपणा शरिरात चरबीचे प्रमाण आदी कारणे आहेत.

नियंत्रण कसे ठेवाल.
वजन कमी करणे, मधुमेह नियंत्रण ठेवणे, उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, औषधींचा गैरवापर टाळणे, तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्लेशिवाय औषधी खावू नये.

Web Title: Growth of Kidney Disease, Supercondition Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.