पालकमंत्र्यांकडून जळू नदीच्या पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:11 AM2021-09-13T04:11:48+5:302021-09-13T04:11:48+5:30
नांदगाव खंडेश्वर : जळू नदीला आलेल्या पुरामुळे माहुली चोर परिसरात झालेल्या नुकसानाची पाहणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नुकतीच केली. ...
नांदगाव खंडेश्वर : जळू नदीला आलेल्या पुरामुळे माहुली चोर परिसरात झालेल्या नुकसानाची पाहणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नुकतीच केली. या नदीच्या पुराचे पाणी माहुली चोर गावात शिरू नये, यासाठी संरक्षणभिंत आहे. ही भिंत नदीच्या पुरामुळे खरडून गेली. त्याची पाहणी यावेळी त्यांनी केली.
पालकमंत्र्यांसमवेत माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा परिषद सभापती सुरेश निमकर उपस्थित होते. जळू नदीच्या पुरामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानाची व्यथा गावकऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडली. यावेळी उपसरपंच देवेंद्र अंबर्ते, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सरोदे, निखिल चोरे, उमेश तिखिले, बंडु जाधव, प्रकाश ओलीवकर, अरुण गाडेकर, सुभाष तिखिले, रोशन पवार, मनोहर पवार, बंडू झंझाट, अमोल ढगे, गणेश खंडारे, कृषिसहायक पंकज लाडके व गावकरी मंडळी उपस्थित होती.
120921\img-20210911-wa0014.jpg
अतिवृष्टीच्या नुकसानीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी.