त्या’बालकाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पालकमंत्री पोहोचल्या रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:09 AM2021-06-05T04:09:59+5:302021-06-05T04:09:59+5:30

बालकाला उपचारात डागण्या, अघोरी उपचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, ना. यशोमती ठाकूर यांचे प्रशासनाला निर्देश अमरावती : मेळघाटातील बालकाच्या ...

The guardian minister reached the hospital to take care of the child's health | त्या’बालकाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पालकमंत्री पोहोचल्या रुग्णालयात

त्या’बालकाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पालकमंत्री पोहोचल्या रुग्णालयात

Next

बालकाला उपचारात डागण्या, अघोरी उपचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, ना. यशोमती ठाकूर यांचे प्रशासनाला निर्देश

अमरावती : मेळघाटातील बालकाच्या पोटावर चटके देऊन उपचार करण्याचा अघोरी प्रकार घडला आहे. याप्रकरणी अघोरी उपचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी मेळघाटात सातत्यपूर्ण जाणीव जागृती कार्यक्रम राबवावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आरोग्य यंत्रणेला शुक्रवारी दिले.

चिखलदरा तालुक्यातील खटकाली येथील राजरत्न जामुनकर हा ३ वर्षीय बालक आठवडाभरापासून आजारी होता. परतवाडा परिसरात आईवडील कामानिमित्ताने असताना बालकाला धामणगाव येथील खासगी डाॅक्टराकडे औषधोपचार केले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने या कुटुंबाने मुलाला भगतबाबाकडे नेले. भुमका बाबाने कोवळ्या निरागस बालकाच्या पोटावर डागण्या दिल्या. त्या बालकावर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री यशेामती ठाकूर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे धाव घेत बालकाच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टर व बालकाच्या आईवडिलांशी संवाद साधला.

---------------------

अघोरी उपचार रोखा, जाणीव जागृती करा

याप्रकरणी जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा. त्याचप्रमाणे, आरोग्य शिक्षणाच्या बाबतीत मेळघाटात भरीव जाणीवजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी भोंदू बाबांवर कारवाई करतानाच पाड्या-पाड्यांवर आरोग्य यंत्रणेद्वारा कार्यक्रम राबवावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

०००

Web Title: The guardian minister reached the hospital to take care of the child's health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.