कोरोनामुळे अनाथ बालकाची पालकमंत्र्यांनी घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:09 AM2021-06-06T04:09:42+5:302021-06-06T04:09:42+5:30

अमरावती : कोरोनामुळे पालकांचे छत्र हरवलेल्या सार्थकची पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी कुऱ्हा येथील घरी जाऊन शनिवारी विचारपूस केली ...

Guardian Minister visits orphaned child due to corona | कोरोनामुळे अनाथ बालकाची पालकमंत्र्यांनी घेतली भेट

कोरोनामुळे अनाथ बालकाची पालकमंत्र्यांनी घेतली भेट

Next

अमरावती : कोरोनामुळे पालकांचे छत्र हरवलेल्या सार्थकची पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी कुऱ्हा येथील घरी जाऊन शनिवारी विचारपूस केली व दिलासा दिला.

कोरोनाच्या संकटामुळे कुणाची आई किंवा वडील गेले, तर काही बालकांचे आई-वडील दोघांचेही निधन झाले आहे. अशाच एका बालकाची शनिवारी ना. यशोमती ठाकूर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली. चंद्रपूरमध्ये राहणाऱ्या सार्थक नरेश तिजारे या बालकाच्या आई-वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे सध्या अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा येथे मामाकडे राहतो. या संकटात एकट्या पडलेल्या सार्थकची ना. ठाकूर यांनी विचारपूस केली.

कोरोनामुळे राज्यातील अनेक मुलांवर अनाथ होण्याची वेळ आली. या सर्व मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सरकारने त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली. “या योजनेचा लाभ ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक ज्यांच्या दोन्ही पालकांचे १ मार्च, २०२० किंवा त्यानंतर कोविड-१६ च्या संसर्गामुळे निधन झाले, अशा बालकांना होणार आहे. या कालावधीत कोविड संसर्गामुळे एका पालकाचा आणि इतर कारणांनी दुसऱ्या पालकाचा मृत्यू झाला, अशा बालकांचाही समावेश आहे. तसेच १ मार्च २०२०पूर्वी कोणत्याही कारणाने एका पालकाचा आणि त्यानंतर कोविड संसर्गाने एका पालकाचा मृत्यू झाला आहे, अशा बालकांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

बॉक्स

मूल २१ वर्षांची झाल्यावर व्याजासह रक्कम

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य मिळणार असल्याचा शासननिर्णय घेण्यात आला आहे. अनाथ झालेल्या मुलांच्या नावे प्रत्येकी ५ लाख रुपये मुदतठेव ठेवली जाणार आहे. ही मुले २१ वर्षांची झाल्यावर त्यांना व्याजासह ही रक्कम मिळेल. तसेच अशा अनाथ झालेल्या बालकांची माहिती नागरिकांनी संबंधित यंत्रणांना दिल्यास त्या मुलांना मदत करता येईल, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

Web Title: Guardian Minister visits orphaned child due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.