पालकमंत्र्यांचा अतिवृष्टी भागात दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:16 AM2021-09-12T04:16:28+5:302021-09-12T04:16:28+5:30

(फोटो घेणे) अमरावती : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून भरपाईचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर ...

Guardian Minister's visit to heavy rain areas | पालकमंत्र्यांचा अतिवृष्टी भागात दौरा

पालकमंत्र्यांचा अतिवृष्टी भागात दौरा

Next

(फोटो घेणे)

अमरावती : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून भरपाईचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वे तालुक्यातील पाहणी दरम्यान दिले. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या विविध भागातील पूरपरिस्थितीची पाहणी ना. ठाकूर यांनी केली.

माजी आमदार वीरेंद्र जगताप, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, कार्यकारी अभियंता विभावरी वैद्य, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान आदी उपस्थित होते. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा गावातील पाझर तलावाचे पाणी परिसरातील ३२ घरांमध्ये शिरले. त्याचप्रमाणे ढवळसरीच्या ५ आणि टीमटाळा येथील ३ घरांचे पावसामुळे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना सानुग्रह अनुदानाची रक्कम तात्काळ प्रदान करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

बेंबळा नदीच्या पुराने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुमारे ५,५९५ हेक्टर शेतात पाणी शिरले, असा प्राथमिक अहवाल आहे. पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले असल्याची माहिती पुरुषोत्तम भुसारी यांनी माहिती दिली.

शिवणी रसुलापूर मार्गावरील बेंबळा व साखळी नदीच्या पुलावरून पाणी गेल्यामुळे परिसरातील शेतीचे नुकसान झाले. ९२ हेक्टर शेतजमीन खरडून निघाली आहे. याबाबतचे तत्काळ पंचनामे करून तसा अहवाल सादर करण्याबाबतचे निर्देश ना.ठाकूर यांनी दिले. बेंबळा नदीच्या पुरामुळे शेलू नटवा येथील ४० हेक्टर वरील बाधित झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

चांदूर रेल्वे तालुक्यातील खोलाड नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे तालुक्यातील १८० घरांची अंशतः पडझड झाली असून ४ घरे पूर्णपणे पडली आहे. याबाबत पंचनामा करण्याची प्रक्रिया तत्परतेने व गतीने करण्यात यावी असे निर्देश ना.ठाकूर यांनी संबंधितांना दिले. चांदूर रेल्वे तालुक्यातील १६ गावातील अंदाजे ३५० हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. २० हेक्टर जमीन खरडलल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी दिली. पंचायत समिती सभापती सरिता देशमुख, पालसखेड सरपंच आरती पारधी, उपसरपंच अमोल अडसड आदी उपस्थित होते. कवठा कडू येथील पुलाची उंची वाढविणे, भिलटेक येथे नालाड नाल्यापाशी संरक्षण भिंत उभारण्यात यावी असे निर्देश ना. ठाकूर यांनी दिले. पळसखेड, कवठा कडू, दिघी या गावातील काही भागांची पाहणी करताना पूरपरिस्थितीत संरक्षक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Guardian Minister's visit to heavy rain areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.