महामानवाच्या प्राथमिक शाळेला पालकमंत्र्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2022 05:00 AM2022-02-20T05:00:00+5:302022-02-20T05:01:02+5:30
जिल्हा कार्यक्रम अधिकारी (बाल कल्याण) रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये येण्याचे मला भाग्य लाभले. या शाळेने अनेक थोर व्यक्ती घडविल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलला महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी भेट दिली व शाळेची पाहणी केली. शाळेतील सुविधांसाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी (बाल कल्याण) रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये येण्याचे मला भाग्य लाभले. या शाळेने अनेक थोर व्यक्ती घडविल्या आहेत. ही शाळा ऐतिहासिक असून याचे जतन केले पाहिजे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले. या संविधानाने सर्वांना समान जगण्याचा हक्क दिला. या शाळेत आल्यानंतर सकारात्मक ऊर्जा मिळाली. राज्य शासन त्यांच्याच विचारांवर काम करीत असून शाळेच्या सोयी-सुविधांसाठी प्रयत्न करणार असल्याचेही महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर त्यावेळी म्हणाल्या.