गुडेवारांचे कार्य ‘न भूतो न भविष्यती’

By admin | Published: May 13, 2016 12:03 AM2016-05-13T00:03:37+5:302016-05-13T00:03:37+5:30

आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांचे एका वर्षातील काम ‘न भूतो न भविष्यती’ असे आहे. त्यांच्या बदलीने विकासकामाला खीळ बसेल, म्हणून त्यांची बदली करू नये, ....

Gudawar's work 'Do not be afraid or future' | गुडेवारांचे कार्य ‘न भूतो न भविष्यती’

गुडेवारांचे कार्य ‘न भूतो न भविष्यती’

Next

नगरसेवकांची एकजूट : बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती
अमरावती : आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांचे एका वर्षातील काम ‘न भूतो न भविष्यती’ असे आहे. त्यांच्या बदलीने विकासकामाला खीळ बसेल, म्हणून त्यांची बदली करू नये, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती नगरसेवक प्रशांत वानखडे, सुनील काळे, प्रदीप बाजड यांनी गुरुवारी दिली.
गुडेवारांची बदली थांबविणे, ही एक चळवळ झाली आहे. त्यात अमरावतीकर जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन एका मंचावर आलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी केले. महापालिकेसह जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात सध्या गुडेवारांच्या बदलीचे वारे घोंगावत आहे. त्या पार्श्वभूमिवर बहुतांश नगरसेवकांनी गुडेवरांच्या समर्थनार्थ गुरुवारी पत्रपरिषद घेतली. या पत्रपरिषदेला अपक्ष नगरसेवक धिरज हिवसे, स्वीकृत नगरसेवक अमोल ठाकरे, राकाँचे सुनील काळे, काँग्रेसचे अ. रफिक, माजी उपमहापौर नंदू वऱ्हाडे, काँग्रेसचे अरूण जयस्वाल, प्रवीण मेश्राम, जयश्री मोरय्या, शिवसेनेचे राजू मानकर, राजेंद्र तायडे, इमरान अशरफी या नगरसेवकांसह अहमदखाँ, सुनील राऊत आदींची उपस्थिती होती. ७० टक्के नगरसेवकांच्या भावना गुडेवारांशी जुळल्या असून १६ मे रोजी होणाऱ्या आमसभेत गुडेवारांसंदर्भातील ठराव एकमुखाने पारित होईल, असा भक्कम आशावाद त्यांनी व्यक्त केला. गुडेवारांच्या बदलीमागे होणाऱ्या कारणाशी आम्हाला देणे-घेणे नाही. मात्र ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच गुडेवारांची बदली झाल्यास ते अमरावतीकरांसाठी अवलक्षण ठरेल, असेही या नगरसेवकांनी म्हटले. शिस्त, प्रशासनावरील भक्कम पकड आणि सोबतच अत्युच्च प्रामानिकतेने गुडेवार यांनी वर्षभरात शहरात उत्कृष्ट काम केले. शहरात होत असलेली कोट्यवधींची विकासकामे, त्याचा दर्जा, ही त्यांच्या कार्यतत्परतेची चुणूक आहे. अमरावतीकरांसह आम्हा लोकप्रतिनिधींनाही त्याची प्रचिती आल्याने ३ वर्षांचा पूर्ण कार्यकाळासाठी गुडेवार यांनी अमरावती महापालिका आयुक्तपदी कायम ठेवावे, अशी विनंती आपण मुख्यामंत्र्यांकडे केली आहे.

Web Title: Gudawar's work 'Do not be afraid or future'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.