ई-पीक पाहणीबाबत कृषिदुतांकडून मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:13 AM2021-09-26T04:13:48+5:302021-09-26T04:13:48+5:30
अमरावती : वसुधा देशमुख कृषी महाविद्यालय बोडणा येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी निखिल इंगोले, ज्ञानेश्वरी गांजरे, तन्वी देशमुख यांनी ग्रामीण ...
अमरावती : वसुधा देशमुख कृषी महाविद्यालय बोडणा येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी निखिल इंगोले, ज्ञानेश्वरी गांजरे, तन्वी देशमुख यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाच्या माध्यमातून रहाटगाव ग्रामपंचायत परिसरातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ॲपबद्दल माहिती दिली. सन २०२१-२२ या वर्षापासून सातबारावर पिकांची नोंदणी ॲपच्या माध्यमातून होणार आहे. ई-पीक पाहणी या ॲपसाठी स्मार्ट फोन शेतकऱ्याकडे असणे आवश्यक आहे. ई-पीक पाहणी ॲपचे फायदे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन त्यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी शेतकरी संदीप सोनार, विवेक खरबडे, प्रकाश सोनार, धीरज मुंडे, दौलतराव काकडे, किसनराव भालेराव, अशोक दहीकर व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सदर उपक्रमाचे आयोजन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय देशमुख, प्रभारी कविता चोपडे, प्रा.दीपिका उके यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.