कृषीदूतातर्फे टेंभुर्णी आजारग्रस्त जनावरांच्या उपचारावर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:16 AM2021-08-13T04:16:28+5:302021-08-13T04:16:28+5:30

जनावरांचे केले लसीकरण चांदूर रेल्वे : पावसाळ्यात जनावरांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. आजारांनी ग्रासलेल्या जनावरांची काळजी कशी घ्यायची, ...

Guidance on the treatment of Tembhurni diseased animals by the envoy | कृषीदूतातर्फे टेंभुर्णी आजारग्रस्त जनावरांच्या उपचारावर मार्गदर्शन

कृषीदूतातर्फे टेंभुर्णी आजारग्रस्त जनावरांच्या उपचारावर मार्गदर्शन

Next

जनावरांचे केले लसीकरण

चांदूर रेल्वे : पावसाळ्यात जनावरांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. आजारांनी ग्रासलेल्या जनावरांची काळजी कशी घ्यायची, याविषयी कृषी महाविद्यालय उमरखेड (जि. यवतमाळ) व ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत कृषिदूत वैभव शेळके यांनी तालुक्यातील टेंभुर्णी येथील शेतकऱ्यांना व पशुपालकांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात एकटांग्या या आजाराला बळी पडत असलेल्या जनावरांचे लसीकरण व जनावरांच्या संतुलित आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. चांदूर रेल्वे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉ. गावंडे यांनी जनावरांना लसीकरण केले. याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.के. चिंतळे व ग्रामीण कार्यानुभव अधिकारी प्रा. सपकाळ व पशु संवर्धन विभागाचे प्रा. एस.व्ही. देशमुख यांच्या मार्गदर्शनात कृषिदूत वैभव शेळके यांनी ही मोहीम राबविली. कार्यक्रमाला शेतकरी व पशुपालक उपस्थित होते.

Web Title: Guidance on the treatment of Tembhurni diseased animals by the envoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.