संत्रा पिकाविषयी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:11 AM2017-12-09T00:11:41+5:302017-12-09T00:12:00+5:30
संत्रा पिकाची घ्यावयाची काळजी, अन्नद्रव्य, पाण्याच्या नियोजनातून उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊन शेतकऱ्यांच्या हातात जादा पैसा कसा येईल, याबाबत मार्गदर्शन तसेच मृदा परीक्षणविषयक माहिती येथे देण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
मोर्शी : संत्रा पिकाची घ्यावयाची काळजी, अन्नद्रव्य, पाण्याच्या नियोजनातून उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊन शेतकऱ्यांच्या हातात जादा पैसा कसा येईल, याबाबत मार्गदर्शन तसेच मृदा परीक्षणविषयक माहिती येथे देण्यात आली.
नागपूर स्थित केंद्रीय लिंबूवर्गीय फळसंशोधन संस्था व मोर्शी तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संत्रा पिकावर चर्चासत्र-प्रशिक्षण तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत कृषी चिकित्सालयात आयोजित करण्यात आले होते. यावेळी लिंबूवर्गीय फळसंशोधन संस्थेचे संचालक मिलिंद दालमिया, तालुका कृषी अधिकारी अनूपकुमार श्रीवास्तव, जी.टी. देशमुख, राजीव मराठे, राव, तालुका कृषी अधिकारी मोर्शी वाय.व्ही. संगेकर, मंडळ कृषी अधिकारी एम. आर. सवई, पी. बी. ढोमणे, एस. के. पाचपोहर, धनंजय ठाकरे, श्रीकेश सावरकर, अरुण चरपे, विनोद बन्सोड, दिनेश नांदणे, मनीष काळे, मीरा निस्ताने, जयश्री वानखडे, सुरेखा रेवतकर, उईके, स्मिता गुडधे, पटवर्धन यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीवास्तव यांनी लिंबू, संत्रा, मोसंबी पीक घेण्यासाठी जमिनीची सुपीकता कशी असावी तसेच पिकांचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. राव यांनी संत्रा झाडांवरील फायटोप्थेरा, डिंक्या, शंख व इतर कीड-रोगांचे नियंत्रण व उपाययोजना कशा कराव्यात, हे शेतकºयांना आपल्या मार्गदर्शनातून पटवून दिले. संचालन व आभार प्रदर्शन डी.पी. चौधरी यांनी केले.