गिटार बॅगमध्ये तलवार घेऊन जाणाऱ्या तरुणास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 22:49 IST2018-02-06T22:49:34+5:302018-02-06T22:49:53+5:30
गिटार बॅगमध्ये तलवार घेऊन जाणाऱ्या एका तरुणाला कोतवाली पोलिसांनी बापट चौकात अटक केली. सोमवारी मध्यरात्री १२.४० वाजता हा प्रकार घडला.

गिटार बॅगमध्ये तलवार घेऊन जाणाऱ्या तरुणास पकडले
आॅनलाईन लोकमत
अमरावती : गिटार बॅगमध्ये तलवार घेऊन जाणाऱ्या एका तरुणाला कोतवाली पोलिसांनी बापट चौकात अटक केली. सोमवारी मध्यरात्री १२.४० वाजता हा प्रकार घडला. उज्ज्वल सुखदेव वानखडे (२७, रा. गुरुकुंज कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. गिटार, तलवार व दुचाकी असा एकूण १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलीस सूत्रानुसार, उज्ज्वल हा एमएच १२ एमके ९७२१ क्रमांकाच्या बुलेटने सोमवारी रात्री शहरात फिरत होता. त्याच्याकडील बॅगमध्ये तलवार असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. निरीक्षक दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई विनोद भगत, सुहास शेंडे, प्रकाश स्वर्गिये, नईम बेग व वाहतूक शाखेचे अमोल नकाशे यांनी पाठलाग करून उज्ज्वलला बापट चौकात थांबविले. त्याच्या गिटार बॅगमध्ये मोठी तलवार आढळली. पोलिसांनी त्याला ठाण्यात नेले. या प्रकरणात ४/२५ आर्म अॅक्टनुसार गुन्हा नोंदविला आहे.