गुजरातमध्ये कांद्याची निर्यात थंडावली, उत्पादकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:40 PM2018-07-16T22:40:53+5:302018-07-16T22:41:12+5:30
कांद्यापासून पावडर व पेस्ट तयार करण्यासाठी गुजरात राज्यात एप्रिल ते जूनमध्ये स्थानिक शेतकऱ्यांचा हजारो ट्रक कांदा पाठविण्यात येतोे. मात्र, यंदा गुजरात राज्यात कांद्याची आवक चांगली झाल्याने या राज्यात अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा एप्रिल ते जून दरम्यान निर्यात झाला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कांद्यापासून पावडर व पेस्ट तयार करण्यासाठी गुजरात राज्यात एप्रिल ते जूनमध्ये स्थानिक शेतकऱ्यांचा हजारो ट्रक कांदा पाठविण्यात येतोे. मात्र, यंदा गुजरात राज्यात कांद्याची आवक चांगली झाल्याने या राज्यात अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा एप्रिल ते जून दरम्यान निर्यात झाला नाही. परिणामी स्थानिक कांदा उत्पादकांना फटका बसला असून, आता येणाºया काही महिन्यात भाव वाढण्याची कुठलीही शक्यता नसल्याचे मत कांदा विक्रेते व कृषी अभ्यासक सतीश कावरे यांनी व्यक्त केले.
गेल्या आठ दिवसांपासून पाऊस असल्याने बटाटे, कांदा, लसूण व इतर पालेभाज्यांची आवक कमी झाली असून, किरकोळ व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उचलत नसल्याचे यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या अमरावती फळ व भाजीबाजारात पांढरा बटाटा हा आग्रा, सिसागंज (उ.प्र.) येथून येत असून, त्याची नेहमीपेक्षा आवक व उचल ४० टक्क्यापर्यंत कमी असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. आलू ला १२००ते १४०० रुपये क्विंटलमागे भाव मिळत आहे, तर कांद्या हा जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून येत आहे.
लसूण इंदूर, निमच, कोटा या ठिकाणावरून अमरावतीत दाखल होत असून, त्याला बाजार समितीत १८०० ते २२०० क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे. मात्र, या सर्व भाजीपाल्यांमध्ये कांद्याला सर्वाधिक मागणी असते. एप्रिल ते जून दरम्यान एकही ट्रक गुजरात राज्यात गेला नाही. पुढील महिन्यात कर्नाटक व मध्य प्रदेशचा कांदा निघणार असून, तो अमरावती येथे दाखल होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कांद्याला यानंतर चांगला भाव मिळू शकणार नसल्याचा अंदाज हा कावरे यांनी व्यक्त केला आहे.
दरवर्षी गुजरात राज्यात अमरावतीतून मोठ्या प्रमाणात निर्यात होते. पण, गेल्या तीन महिन्यांत एक ट्रक ही कांदा गुजरात राज्यात गेला नाही. त्या कारणाने आता आवकही कमी झाली व भावसुद्धा चांगला मिळण्याची शक्यता नाही
- सतीश कावरे,
कांदा व्यापारी
आठ दिवसांपासून पाऊस असल्याने बटाटे व इतर भाजीपाल्याची आवक कमी आहे. किरकोळ व्यापाऱ्यांकडून उचल नसल्याने भाव कमी आहे.
चंदीराम आहुजा, ठोक विक्रेता
गेल्या काही आठवड्यापासून आवक कमी झाल्याने सेससुद्धा कमी मिळत आहे. पंधरा ते वीस हजारांचा सेस आता आठ ते दहा हजार प्रतिदिनावर आला आहे
- आर. पी. वानखडे
विभागप्रमुख,
फळ व भाजीबाजार