बारूद गँगने सिनेस्टाईल केला पाठलाग

By admin | Published: August 21, 2015 12:39 AM2015-08-21T00:39:00+5:302015-08-21T00:39:00+5:30

अमितचे हत्याकांड घडवून आणण्यापूर्वी बारूद गँगने अचलपुरात मोहन यांचा सीनेमातील खलनायकाने घ्यावा तसा शोध घेतला होता.

Gunboe ganga made cinestyle chase | बारूद गँगने सिनेस्टाईल केला पाठलाग

बारूद गँगने सिनेस्टाईल केला पाठलाग

Next

नागरिक होऊ लागले जागरूक : परराज्यातही अवैध व्यवसायाचे अड्डे
अमरावती/अचलपूर : अमितचे हत्याकांड घडवून आणण्यापूर्वी बारूद गँगने अचलपुरात मोहन यांचा सीनेमातील खलनायकाने घ्यावा तसा शोध घेतला होता. बारुद्ध गँगची ही शोधाशोध ज्यांनी बघितली त्यांना ती अक्षरश: हिंदी चित्रपटातील गँग भासत होती. जो मोहनचा पत्ता देत नव्हता त्याला मारहाण करण्यात येत होती. एका धोत्रे नामक व्यक्तीने धाडस दाखवून सरमसपुरा पोलीस ठाण्यात या गँगच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार ७ जणांविरूद्ध दंगल माजविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारूद गँगचे फक्त अचलपुरातच नव्हे, तर तालुक्याबाहेरही अवैध व्यवसाय होते. प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर मुक्तागिरीनंतर असलेल्या पल्लासखेडी गावात त्यांचा मोठा जुगार अड्डा चालत असे.
जुगाऱ्यांना ने-आण करण्यासाठी चारचाकी
अमरावती/अचलपूर : त्यात बारूद गँगचे रम्मू, जम्मू, बादशा यांचेसह शिरभाते, बब्बूभैय्या, जयनार आदी २२ जण पार्टनर होते. ते सर्व मिळून हा अड्डा चालवत असत. यात ५ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल होत असे या उलाढालीत १ लाखांपेक्षा अधिक रकमेची मिळकत रोज होत होती. नंतर ते आपसात वाटून घेतले जात होते. या अड्ड्यावर जुगार खेळणाऱ्यांची चहा-पाण्यापासून ते जेवणापर्यंतची व्यवस्था केली जात होती. जुगाऱ्यांना बाहेरगावहून ने-आण करण्यासाठी चारचाकी वाहनाचीही व्यवस्था होती. परतवाडा येथील गुजरी चौकातून या गाड्या येत असून त्यासाठी काही गुप्त एजंट ठेवलेले होते. ते सावजाला हेरून गाडीत बसवून पल्लासखेडीला रवाना करीत होते. जुगारअड्डा प्रभावित झाला असला तरी तो पूर्णपणे बंद झालेला नाही.
लोकमत अंकाचे सामूहिक वाचन
बारूद गँगच्या दहशतवादाविरूद्ध ‘लोकमत’ने निर्भीडपणे उघडलेल्या मोहिमेबद्दल अध्यापक संजय चोबे, नगरसेवक अभय माथने, नगरसेवक नितीन डकरे, नगरसेवक संजय भोंडे, अध्यापक संजय सुरजुसे, गजेंद्र ढवळे, माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र फिसके, ओमप्रकाश दीक्षित, अनिल तायडे, अभिजित सरोदे, संजय टांक, राजा पिंजरकर, सागर यावले, विनायक खेडकर, नितीन भुयार, सतीश आकोलकर, भोला चव्हाण, सुहास दातीर, नितीन कुळकर्णी, अमोल गोहाड, प्रितेश अवघड, उत्तम साखरे (प्रहार), योगेश चांदणे यांचेसह आदींनी अभिनंदन केले असून ‘लोकमत’चे सामूहिक वाचन सुरू आहे.
गाड्यांवर आरडीएक्स अंकित
अचलपूर-परतवाड्यातील काही दुचाकी, तीनचाकी (आॅटो) व चारचाकी गाड्यांवर आरडीएक्स असे लिहिले आहेत. या गाड्यांचे मालक किंवा चालक या बारूद गँगचे सदस्य असल्याचा लोकांचा संशय आहे. पोलिसांनी आरडीएक्स लिहिलेल्या गाड्यांचा शोध घेऊन यासंदर्भात खुलासा करावा, अशी जनतेची मागणी आहे.

Web Title: Gunboe ganga made cinestyle chase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.