वरूड शहरात गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:10 AM2021-06-22T04:10:22+5:302021-06-22T04:10:22+5:30
वरूड : राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण उपपथक व हिवताप कार्यालय ग्रामीण रुग्णालय यांनी पावसाळ्याच्या दिवसांत पसरणाऱ्या डेंग्यू, हिवताप, हत्तीरोग, ...
वरूड : राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण उपपथक व हिवताप कार्यालय ग्रामीण रुग्णालय यांनी पावसाळ्याच्या दिवसांत पसरणाऱ्या डेंग्यू, हिवताप, हत्तीरोग, चिकनगुनिया या साथरोगांवर प्रतिबंध घालण्यासाठी गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम केली आहे. पावसाळ्यातील साथरोग, कोरोनाबद्दल जनजागृती तसेच कंटेनर सर्वेक्षण, रक्त नमुने, व्हेन्ट पाईपला कापड बांधणी आदी उपक्रम वरूड शहरात राबविण्यात येत आहेत.
पावसाळ्याच्या दिवसांत पसरणाऱ्या डेंग्यू, हिवताप, हत्तीरोग, चिकनगुनिया या साथरोगांवर प्रतिबंध घालण्यासाठी गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम केली आहे. सदर मोहीम हिवताप व हत्तीरोग सहायक संचालक डॉ. कमलेश भंडारी यांच्या संकल्पनेतून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणमले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी, जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉ. जुनैद, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान वरूड शहरातील पाणी साचलेल्या डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडून साथ नियंत्रण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून पाळला जातो, तर डासोत्पत्ती स्थानांवर १५ जुलै या एकाच दिवशी गप्पी मासे सोडण्याचा संकल्प कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, घरासमोरील नाली गटारे वाहती करावी, असे आरोग्य शिक्षण यादरम्यान देण्यात आले. हत्तीरुग्णांना साहित्यवाटप करण्यात येत आहे. या मोहिमेत आरोग्य सहायक सुनील वाडीकर, हिवताप आरोग्य कर्मचारी किसन नेहारे, हत्तीरोग कर्मचारी रमेश वाघमारे, विपुल शिनकर, प्रवीण बांगर, विजय शिंदे आदी सहभागी झाले.