सायबर टीमकडून गुडगावातील एटीएमची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 11:13 PM2017-11-05T23:13:21+5:302017-11-05T23:13:34+5:30

स्टेट बँक आॅफ इंडियाचे खातेदारांचे पैसे चोरणाºया आरोपीच्या शोधात अमरावतीची सायबर टीम हरियाणा राज्यातील गुडगावात पोहोचली आहे.

Gurgaon ATM plantation from cyber team | सायबर टीमकडून गुडगावातील एटीएमची झाडाझडती

सायबर टीमकडून गुडगावातील एटीएमची झाडाझडती

googlenewsNext
ठळक मुद्देएसबीआय खातेदारांचे फसवणूक प्रकरण : परस्पर पैसे काढले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्टेट बँक आॅफ इंडियाचे खातेदारांचे पैसे चोरणाºया आरोपीच्या शोधात अमरावतीची सायबर टीम हरियाणा राज्यातील गुडगावात पोहोचली आहे. रविवारी पोलिसांनी काही एटीएमच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली होती. त्यामुळे आता लवकरच खातेदारांचे पैसे चोरी करणाºयाचा शोध लागण्याचे चिन्ह दिसू लागले आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरातील एसबीआय खातेदारांच्या खात्यातून परस्पर पैसे काढल्याच्या १५ घटना पुढे आल्या आहेत. बँक खातेदारांच्या खात्यातून जवळपास १० लाखांची रोख सायबर गुन्हेगारांनी काढून घेतली. यामध्ये सर्वाधिक खातेदार एसबीआयचे आहेत. एसबीआयच्या एटीएमची सुरक्षा वाºयावर असल्यामुळे गुन्हेगारांनी स्किमर व कॅमेºयाच्या सहाय्याने थेट एटीएममधून खातेदारांची माहिती मिळविली आहे. त्या माहितीच्या आधारे एटीएम क्लोनिंग करून रोखीची चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात सायबर सेलच्या पोलिसांनी जिल्हाभरातील काही एटीएमचे सीसीटीव्ही फुटेजची तपासले. मात्र, अद्यापही गुन्हेगारांचा शोध लागला नाही. ज्या खातेदारांची फसवणूक करण्यात आली, त्यांची रक्कम ही हरियाणातील गुडगावातून विड्रॉल झाल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे. त्याअनुषंगाने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या मार्गदर्शनात सायबर सेलचे पोलीस अधिकारी व कर्मचारी शनिवारी गुडगावकरिता रवाना झाले. रविवारी पोलीस गुडगावात पोहोचले असून त्यांनी गुडगावातील काही एटीएमची सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. आता या प्रकरणातील तपासाला गती मिळाली असून एपीआय कांचन पांडे नेतृत्वात संग्राम, सुभाष पाटीलसह अन्य पोलीस या प्रकरणाविषयी तपास करीत आहेत.
एटीएमची सुरक्षा वाºयावर
स्टेट बँक आॅफ इंडियाचे विभागात ६०, तर शहरात जवळपास १५ एटीएम आहेत. मात्र, बहुतांश एटीएमची सुरक्षा वाºयावरच आहे. क्वचितच एटीएमवर सुरक्षा रक्षक आहेत.स्टेट बँकेच्या दुर्लक्षामुळेच खातेदारांची माहिती मिळविण्यास गुन्हेगारांना यश आले आहे. सुरक्षारक्षक नसणाºया एटीएममध्ये गुन्हेगारांनी स्किमर व कॅमेरा लावून खातेदारांची माहिती गोळा केल्याचे पोलीस चौकशीत पुढे येत आहे. एटीएममध्ये स्कार्प बांधून नागरिक पैसे काढण्यासाठी जातात, अशा प्रकारामुळेच सायबर गुन्हेगारांना बळ मिळत आहे.
बँकांचे आवाहन
एटीएम कार्ड नंबर किंवा पिन नंबर बदलत राहावे, व्यवहार पूर्ण झाल्याची सूचना मिळाल्यावरच एटीएममधून बाहेर पडावे. बँकेसंबंधी माहिती विचारणारे फोन आल्यास माहिती देऊ नका, सायबर सेलशी संपर्क साधा, असे आवाहन बँक अधिकाºयांनी केले.
एटीएम क्लोनिंग गुन्ह्यांची पालकमंत्र्यांकडून दखल
एटीएम क्लोनिंगद्वारे होणाºया फसवणूक प्रकरणात पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गंभीर दखल घेत तत्काळ कारवाईचे निर्देश पोलिसांना दिलेत. यासंदर्भात शासकीय विभागाची आढावा बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. एटीएम क्लोनिंगच्या फसवणूक प्रकरणात बँका काय कारवाई करीत आहे, याचा आढावा घेतला व अशा घटना रोखण्याचे सक्त निर्देश दिले.
पैसे परत करण्याची जबाबदारी बँकेची
एसबीआयच्या खातेदारांनी माहिती न देताच परस्पर खात्यातून पैसे काढले जात आहे. खातेदारांच्या पैशांची सुरक्षा ही बँकेची जबाबदारी असून खातेदारांचे चोरी गेलेले पैसे परत देण्याची जबाबदारीही बँकेचीच आहे.
एसबीआयचे 'क्विक अ‍ॅप्लिकेशन' उपलब्ध
स्टेट बँक आॅफ इंडियाकडून अशा घटना रोखण्यासाठी एसबीआय क्विक ही अ‍ॅप्लिकेशन खातेदारांसाठी उपलब्ध करून दिली आहे. या अ‍ॅप्लिकेशनद्वारे बँक खातेदारांना एटीएम सुरू किंवा बंद करता येणार आहे. पैसे काढल्यानंतर या अ‍ॅप्लिकेशनद्वारे एटीएम बंद करून ठेवता येणार आहे.

Web Title: Gurgaon ATM plantation from cyber team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.