गुरुकुलचा केला पालकांनी निषेध

By admin | Published: January 12, 2016 12:21 AM2016-01-12T00:21:13+5:302016-01-12T00:21:13+5:30

संस्थाध्यक्षांनी दिलेली अपमानास्पद वागणूक व अभ्यासक्रमाबाबत केलेली दिशाभूल याबाबतचा गुरुकुल पब्लिक स्कूलमधील वाद चिघळला आहे.

Gurukul's parents protested | गुरुकुलचा केला पालकांनी निषेध

गुरुकुलचा केला पालकांनी निषेध

Next

धक्काबुक्कीही : संस्थाध्यक्षाविरूद्ध फसवणुकीची तक्रार
अचलपूर : संस्थाध्यक्षांनी दिलेली अपमानास्पद वागणूक व अभ्यासक्रमाबाबत केलेली दिशाभूल याबाबतचा गुरुकुल पब्लिक स्कूलमधील वाद चिघळला आहे. पालकांनी आज शाळा परिसराबाहेर निषेध सभा घेतली. व्यवस्थापनाची बाजू मांडणाऱ्या एका पालकासोबत धक्काबुक्की करण्यात आली.
येथील रेल्वे स्टेशन परिसरातील गुरूकुल पब्लिक स्कूल येथे शनिवारी मुख्याध्यापक सुधीर इंगळे यांनी सीबीएसई अभ्यासक्रम प्रक्रियेविषयी सभा आयोजित केली होती.
या शाळेत सीबीएससी अभ्यासक्रम नाही हे माहीत झाल्याने पालकवर्ग संतप्त झालेला होता. त्यात सभास्थानी गैरसोय असल्याने त्या संतापात भर पडला. याचा जाब संस्थाध्यक्ष रवींद्र गोळे यांना पालकांनी विचारला असता त्यांनी अपमानास्पद वागणूक दिली असा आरोप पालकांचा आहे.
आज सकाळी शाळेच्या आवाराबाहेरील मैदानात संस्थाध्यक्ष गोळे यांनी पालकांची सीबीएससीबाबत केलेली फसवणूक व दिलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ सभा घेण्यात आली. संस्थाअध्यक्षांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा तसेच अभ्यासक्रमाबाबत केलेल्या दिशाभूल करण्याच्या प्रकरणाचा कडाडून निषेध करण्यात आला.
यावेळी गजेंद्र वारके, सुधीर मालखेडे, नरेंद्र फिसके, राजाभाऊ धर्माधिकारी इत्यादींची भाषणे झाली. सभास्थानी सुमारे ३०० पेक्षा जास्त पालक उपस्थित होते.
यावेळी संस्थाध्यक्षाच्या बाजूने बोलणाऱ्या हेडा नामक पालकाला उपस्थित काही पालकांनी धक्काबुक्की करून सभास्थानाहून पळवून लागले तर काही पालकांनी हेडा यांनी आम्हाला शिवीगाळ करून अंगावर धाऊन आले व यांचेपासून आमच्या पाल्याच्या जिवास धोका असल्याचा तक्रार अर्ज पोलीस ठाण्यात दिला.(प्रतिनिधी)

Web Title: Gurukul's parents protested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.