परतवाड्यात १७ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 05:00 AM2021-12-23T05:00:00+5:302021-12-23T05:01:01+5:30

गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा परीविक्षाधीन अधिकारी गौहर हसन यांनी केली. त्यांना पोलीस कॉन्स्टेबल शेख गणी व विराज ठाकूर यांनी सहकार्य केले. मंगळवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास बैतूल मार्गावरील बैतूल नाक्यासमोरील स्मशानघाटालगत हा ट्रक ताब्यात घेण्यात आला.

Gutka worth Rs 17 lakh seized in return | परतवाड्यात १७ लाखांचा गुटखा जप्त

परतवाड्यात १७ लाखांचा गुटखा जप्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : दिल्लीवरून बैतूलमार्गे परतवाड्याकडे येत असलेला १६ लाख ९५ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा असलेले पन्नास पोते वाहून आणणारा १४ चाकी ट्रक पोलिसांनी पकडला. आरजे ११ जीबी ८५९३  क्रमांकाच्या ट्रकसह एकूण ४१ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा परीविक्षाधीन अधिकारी गौहर हसन यांनी केली. त्यांना पोलीस कॉन्स्टेबल शेख गणी व विराज ठाकूर यांनी सहकार्य केले. मंगळवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास बैतूल मार्गावरील बैतूल नाक्यासमोरील स्मशानघाटालगत हा ट्रक ताब्यात घेण्यात आला.
 परतवाडा पोलीस ठाण्याच्या आवारात ट्रक लावल्यानंतर झडती घेतली असता त्यात ‘’वाह’’ नामक गुटख्याचे पन्नास पोती आढळून आली. ही पोती ट्रकच्या मधोमध ठेवून त्याच्या आजूबाजूला व वर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे बॉक्स ठेवण्यात आले होते. यामुळे या पोत्यांचा अंदाज येणेही शक्य नव्हते. 
पायलटिंग करणारी कार (एमएच ४३ डी ८३४४) ट्रकच्या पुढे मार्गस्थ होती. ही बाब लक्षात येताच आयपीएस गौहर हसन यांनी ही कारही परतवाडा पोलीस ठाण्यात उभी केली. या कारमधून प्रवास करणाऱ्या अचलपूर येथील तीन व्यक्तींना रात्रभर पोलीस स्टेशनला  डिटेन करून ठेवण्यात आले. 

गुटख्याची खेप अमरावतीला?
ट्रकचालकाच्या सांगण्यानुसार, ही खेप अकोल्यासाठी होती. पोत्यांमध्ये प्रतिबंधित गुटखा नव्हे, तर सुगंधी पदार्थ असल्याचे ट्रक भरताना सांगितले गेल्याचे तो म्हणाला. काहींच्या मते हा गुटखा अमरावतीला उतरविला जाणार होता. पुढील तपास परतवाडा ठाणेदार संतोष ताले व त्यांचे सहकारी करीत आहेत.

चालक ताब्यात
ट्रकचालक रामभरण धाकड व क्लीनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पकडलेल्या प्रतिबंधित गुटख्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

गुप्त माहितीच्या आधारे बैतूल-परतवाडा रोडवर बैतूल नाक्याच्या पुढे प्रतिबंधित गुटखा घेऊन येत असलेला ट्रक पकडण्यात आला. मंगळवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजताच्या सुमारास हा ट्रक पकडण्यात आला.
- गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी, अचलपूर.

प्रतिबंधित गुटखा आयपीएस गौहर हसन यांनी पकडला असून त्यांची ही कारवाई आहे. यातील गुटख्याच्या एका पोत्याची किंमत ३३ हजार ९०० रुपये आहे. एकूण ४१ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
- संतोष ताले, ठाणेदार, परतवाडा

 

Web Title: Gutka worth Rs 17 lakh seized in return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.