चांदूर रेल्वेत अवैधरीत्या विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या गुटखा, सुगंधित तंबाखूच्या दुकानावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:13 AM2021-05-11T04:13:59+5:302021-05-11T04:13:59+5:30

चांदूर रेल्वेत अवैधरीत्या विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या गुटखा, सुगंधित तंबाखूच्या दुकानावर धाड एका आरोपीला घेतले ताब्यात ठाणेदार मगन मेहते यांच्या ...

Gutkha, fragrant tobacco shops raided for illegal sale on Chandur Railway | चांदूर रेल्वेत अवैधरीत्या विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या गुटखा, सुगंधित तंबाखूच्या दुकानावर धाड

चांदूर रेल्वेत अवैधरीत्या विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या गुटखा, सुगंधित तंबाखूच्या दुकानावर धाड

Next

चांदूर रेल्वेत अवैधरीत्या विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या गुटखा, सुगंधित तंबाखूच्या दुकानावर धाड

एका आरोपीला घेतले ताब्यात

ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात कारवाई

चांदूर रेल्वे - (ता. प्र.)

चांदूर रेल्वे शहरात अवैधरीत्या विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या गुटखा, सुगंधित तंबाखूच्या दुकानावर धाड टाकून मुद्देमाल जप्त केला असून, यात एका आरोपीला ताब्यात घेतल्याची कारवाई ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात चांदूर रेल्वे पोलिसांनी ९ मे रोजी दुपारी २ वाजता केली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चांदूर रेल्वे शहरातील शिवाजीनगरमधील रहिवासी आरोपी गणेश नारायण माहूलकर (४३) याच्या घरी असलेल्या दुकानात प्रतिबंधित गुटखा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून रविवारी ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात पो.हे.कॉ. शिवाजी घुगे, पो.कॉ. विनोद वासेकर, पो.कॉ. सिद्धोधन उमाळे, महिला पोलीस आरती कुंजेकर, चालक जगदीश राठोड या पथकाने शिवाजीनगरस्थित सदर ठिकाणी धाड टाकली. घरात असलेल्या दुकानाची झाडाझडती घेतली असता आरोपी गणेश माहूलकर याच्या घरातील दुकानातून महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित तंबाखू अवैधरीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेला मिळून आला. सुगंधित तंबाखू, गुटखा पान मसाला, स्वीट सुपारी, असा एकूण ७ हजार ५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी गणेश माहूलकर याला ताब्यात घेतले होते. आरोपीविरुद्ध भादंवि कलम १८८, २७२, २७३ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Web Title: Gutkha, fragrant tobacco shops raided for illegal sale on Chandur Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.